जव्हार नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर; एकूण २० सदस्यांसाठी १० प्रभाग निश्चित

Date: 2025-10-05
news-banner
जव्हार नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर; एकूण २० सदस्यांसाठी १० प्रभाग निश्चित

जव्हार, पालघर – जव्हार नगरपरिषद क्षेत्राची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने तयार केलेल्या या रचनेनुसार, नगरपरिषदेत एकूण २० सदस्य निवडण्यासाठी १० प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. ही अधिसूचना पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी तत्परतेने लागू होईल.खाली प्रत्येक प्रभागात समाविष्ट क्षेत्र दर्शविण्यात आले आहे.

प्रभागांची माहिती:

प्रभाग ०१: नवीन पॅट्रोल पंप परिसर, लोकसंख्या – १३३२, अ.जा.- ४८, अ.ज.- ४२६

प्रभाग ०२: गोरवाडी, लोकसंख्या – १५५०, अ.जा.- १५२, अ.ज.- ९८३

प्रभाग ०३: यशवंतनगर परिसर, लोकसंख्या – १२८५, अ.जा.- २४८, अ.ज.- २५५

प्रभाग ०४: राममंदीर परिसर, लोकसंख्या – १२२९, अ.जा.- २४, अ.ज.- ११३

प्रभाग ०५: नवापाडा, दर्गाआळी, महादेव मंदिर परिसर, सनसेंट पॉईंट, लोकसंख्या – १११३, अ.जा.- ३५, अ.ज.- ५०७

प्रभाग ०६: घागचाळ परिसर, नवीन पोलिस लाईन परिसर, लोकसंख्या – १२६०, अ.जा.- ६०, अ.ज.- ५३८

प्रभाग ०७: जिमखाना परिसर, फॉरेस्ट डेपो, बस स्टॉप, डॅमआळी, लोकसंख्या – ११५४, अ.जा.- ४०, अ.ज.- ४६६

प्रभाग ०८: लोहारपाडा, डॅमआळी, सटाणेकर परिसर, लोकसंख्या – १०८६, अ.जा.- १३०, अ.ज.- २४६

प्रभाग ०९: महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, मुकणे कॉलनी, लोकसंख्या – ९४९, अ.जा.- १४४, अ.ज.- ७९

प्रभाग १०: मांगेलवडा, वाजेआळी, सुर्यतलाव परिसर, लोकसंख्या –
 १०८२, अ.जा.- ४८, अ.ज.- ५९०

Leave Your Comments