जिंदाल कंपनीच्या प्रस्तावित मुरबे बंदर जनसुनावणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ?

Date: 2025-10-06
news-banner
https://youtu.be/VfF_LU3s2AI?si=ffwXRgkFHO-Ok4LL

जिंदाल कंपनीच्या प्रस्तावित मुरबे बंदर जनसुनावणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ?

                जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जेएसडब्ल्यू उर्फ जिंदाल कंपनीच्या मूरबे येथील प्रस्तावित बंदरा संबंधातील जन सुनावणी सोमवार ७ ऑक्टोबर रोजी खारेकुरण रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीकरता प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला असून जिल्हा क्रीडा संकुलात मोठा मंडपही उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त पर्यावरण आघात मुल्याकन अहवालाच्या
 आधारे ही जनसुनावणी होत असून या जनसुनावणीत ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
         मुरब येथील या बंदरास मुरबे व परिसरातील गावातील ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच या परिसरातील ग्रामस्थांनी बोईसर "येथील जिंदल कंपनीवर मोर्चा नेऊन आपला विरोध दर्शवला आहे.
        या जनसुनावणी करता परिसरातील ग्रामपंचायतींना कळविण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रावरून दिसून येते. साहजिकच या सर्व गावातून जन सुनावणीकरता मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या जनसुनावणीसाठी खालील ग्रामपंचायतींना कळविण्यात आल्याचे प्रदूषण मंडळाच्या पत्रावरून दिसते.

          यात आलेवाडी, बेटेगाव, बिरवाडी, चहाडे, दांडी, दापोली, नवी देलवाडी, धनसार, घिवली, गिरनोळी, गुंदले, कुरगाव, काटाळे, खैरापाडा (बोईसर), कोकणेर, कोलवडे, कोळगाव, मासवण, मोरेकुरण, मुरबे, नांदगाव तर्फे तारापूर, नवापूर, पडघे, पाम, पाम टेंभो, पथराळी, सागावे, सालवड, सरावली, सातपाटी, शिरगाव, उच्छेळी, उमरोळी, उनभाट, बेंगणी, परनाळी, अंबाडी/ शेलवाली, बोईसर / दांडीपाडा / काटकरपाडा, देवखोप/नंडोरे, कमारे/ वरखूंटी / टोकराळे, खारेकुरण / विकासवाडी, कुंभवली / एकलारे, मान/ कल्लाळे/ वारांगडे/कांबळगाव, शिगांव खुताड/ सुमडीपाडा, माहीम / वडराई/ हरणवाडी, पास्थळ/सालगाव, नेवाळे/राणीशिगाव, वांदिवली/वसरोली/ खरशेत/वाकडी, पंचाळी / आगवण ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

        प्रदूषण नियंत्रण मंडळांने ग्रामपंचायत व सर्व संबंधितांना पाठवलेल्या पत्रात जे एस डब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, मुरबे, पालघर यांनी येथील प्रस्तावित सर्व हवामान, बहुउद्देशीय मालवाहतुक. ग्रीनफील्ड, खोल पाण्याचे बंदर विकास प्रकल्पाबाबत पर्यावरण मंजुरी मागणारी सार्वजनिक सुनावणी आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याचे म्हटले आहे. या पत्रात प्रदूषण मंडळाने पुढे सदर प्रकल्पाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी ही पर्यावरण आघात मुल्यांकन अधिनियम २००६ नुसार घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करून त्यानुसार सदर जनसुनावणी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रिडा संकुलाचे मैदान, सोनोपंत दांडेकर कॉलेज जवळ, कॉलेज रोड, टेंभोडे, ता. जि. पालघर या ठिकाणी ०६.१०.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असल्याचे कळविले आहे.
           सदर प्रकल्प आराखड्याची माहिती असलेली पर्यावरण आघात मुल्याकन अहवालाची व कार्यकारी सारांशाची मराठी व इंग्रजी मधील प्रत संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आल्याचेही यात म्हटले असून सदर दस्तावेज संबंधित व्यक्तींना अभ्यासण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात यावेत व सदर प्रस्तावित प्रकल्पाचा अहवाल जनतेच्या माहितीकरीता आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावा व जनसुनावणी बाबत आपल्या कार्यालयामार्फत सुध्दा व्यापक प्रसिध्दी मिळेल, असे पहावे, असे नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-२ चे उप-प्रादेशिक अधिकारी, विरेंद्र रा. सिंह यांच्या सहीचे हे पत्र आहे.

Leave Your Comments