वसई मतदारसंघ: हितेंद्र ठाकूर व बविआच्या अस्तित्वाची लढाई*

Date: 2024-11-20
news-banner
*जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात अशा होणार लढती:
हितेंद्र ठाकूर व बविआच्या अस्तित्वाची लढाई*
QIrnvvy.jpeg

ENGdLyt.jpeg
 
O9Ei1zJ.jpeg

      * बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांची सर्व प्रतिष्ठा या विधानसभा निवडणूकीत पणाला लागणार आहे. भाई ठाकूर यांना मतदारांपर्यंत आणून त्यांनी याची प्रचिती दिली आहे. २०१९ च्या निवडणूकीत वसई मतदासंघातून हितेंद्र  ठाकूर हे निवडून आले होते. त्यांना १ लाख २ हजार ९५० (५४.१८ टक्के) तर त्यावेळी एकत्रित शिवसेनेचे विजयी होते. २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र वसई मतदारसंघातील मतदारांनी बविआची प्रचंड निराशा केली. अर्थात ही त्यावेळी काही खेळी होती की काय अशी चर्चाही रंगली. महायुतीला त्यावेळी ७६ हजार ३०७(३८.१२टक्के) मते मिळाली,तर महाविकास आघाडी ६६ हजार ८८८(३३.४१टक्के) मते मिळवून दुसर्‍या क्रमांकावर व बविआ ५०हजार ८६८(२५.४१टक्के)इतक्या मतांवर सिमीत राहून तिसर्‍या क्रमाकांवर राहिले. यावेळी महायुती व बविआमधील मतांचे अंतर २५ हजार ४३९(१२.७१ टक्के) तर महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील अंतर ९४१९(०४.७१ टक्के) इतकेच राहिले होते. बविआच्या मतांपेक्षा मविआने त्यावेळी १६हजार २० इतक्या मतांची आघाडी घेतली होती.    
        २०१९ विधानसभा निवडणूकीत ह्या मतदारसंघात १ लाख ९० हजार ५९३(६२.५६ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणूकीत २ लाख १६० (५९.१२ टक्के) इतके मतदान झाले होते.३५४ मतदानकेंद्र असलेल्या या मतदारसंघाची मतदारसंख्या ३ लाख ५४ हजार ६५२ इतकी असून यामध्ये पुरुष १ लाख ८१ हजार ८९८ तर महिला १ लाख ७२ हजार ७४२ अशी विभागणी आहे. येथे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर विरुध्द मविआ काँग्रेसचे विजय पाटील व महायुती भाजपच्या स्नेहा दुबे अशी तिरंगी लढत आहे. याव्यतिरिक्त बसपा विजय तांबेसह तीन अपक्ष मिळून एकूण ०७ उमेदवार रिंगणात आहेत.
या मतदारसंघात ख्रिश्चन मतदारांबरोबरीने ग्रामीण आणि शहरी अशीही या मतदारसंघाची विभागणी आहे.खिश्चन पाठोपाठ वाडवळ,आगरी,मच्छिमार तसेच आदिवासी समाजही ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे.
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना यापूर्वी ख्रिश्चन समुदायासह सर्व समाजघटकांतून पाठिंबा मिळत राहिला आहे. मात्र प्रयत्न करुनही लोकसभा निवडणूकीत त्यांना पुर्वापार मानणारा हा वर्ग त्यांच्याकडून सरकल्याचे दिसून आले. ह्या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. विधानसभेत हा मतदार हक्काने आपल्या बाजूने उभा राहतो असे ते म्हणतात.स्वत:चे व्यक्तिगत वलय तसेच वसईच्या विकासासाठी आजवर केलले प्रयत्न, याचबरोबरीने महानगरपालिकेतील सत्ता व त्या माध्यमातून त्यांचे समर्थक नगरसेवक ही त्यांची बलस्थाने आहेत. याऊलट महायुतीच्या स्नेहा दुबे ह्या लाडकी बहीण योजना व राज्य सरकारने केलेली कामे तसेच मोदीच्या राजवटीत झालेली कामे व त्यांचा चरिष्मा यावर मते मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्नेहा दुबे या  श्रमजीवी संघटनेचे नेते व ज्येष्ठ राजकीय नेते विवेक पंडित यांच्या कन्या आहेत. श्रमजीवी संघटनेचा त्यांना साहजिकच पाठींबा आहे.अर्थात त्या गेली अनेक वषे सामाजिक व राजकीय कामात सक्रिय आहेत. वडील आणि आई यांच्या वलयाचा देखील लाभ मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विवेक पंडित आमदार म्हणून निवडून आले तेव्हा या मतदारसंघातील ग्रामीण भागातून पंडित यांना मोठे समर्थन मिळाले होते. ते समर्थन मिळवण्याचाही दुबे यांचा प्रयत्न आहे. मात्र २०१४ मधील पराभवानंतर विवेक पंडित यांनी या मतदारसंघाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात असून त्यांचा या मतदारसंघाशी फारसा संबंध न राहिल्याने स्नेहा दुबे यांना असा लाभ मिळवता येईल का असा प्रश्न आहे.युती सोबत राहूनही गावे वगळण्याच्या प्रश्नात   पंडित यांनी भाजपाला जाब विचारला नसल्याचाही आक्षेप त्यांच्यावर आहे.याचबरोबरीने पुरोगामी विचाराचे असूनही ते भाजपासोबत कसे असा प्रश्नही त्यांना विचारला जात आहे.
           याऊलट मविआ काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील हे २०१९ च्या निवडणूकीत देखील उभे होते. त्यांचे व ठाकूर ह्यांच्यातील मतांचे अंतरही त्यावेळेला मोठे नव्हते.  लोकसभा निवडणूकीत मविआ व महायुतीमधील अंतर फारच कमी असल्याने  हे अंतर भरुन काढता येईल असा विश्वास  पाटील यांना आहे.ते सर्वपरिचित असून विविध उपक्रमाद्वारा ते जनतेशी जोडले गेलेले आहेत.लोकसभा निवडणूकीप्रमाणेच वसईतील ख्रिश्चन, मुस्लिम,दलित तसेच पुर्वापार काँग्रेस्।,राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्ष तसेच समाजवादी विचारांचे मतदार, त्याचबरोबरीने वसईतील विविध जनसंघटनांचा पाठिंबा यांचे बळ विजय पाटील यांच्या बाजूने उभे राहणार आहे.जिल्ह्यातील ही सर्वात प्रतिष्ठित व हितेंद्र ठाकूर तसेच बविआचे यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक ठरणार आहे.
         २०१९ विधानसभा निवडणूकीत ह्या मतदारसंघात १ लाख ९० हजार ५९३(६२.५६ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणूकीत २ लाख १६० (५९.१२ टक्के) इतके मतदान झाले होते.३५४ मतदानकेंद्र असलेल्या या मतदारसंघाची मतदारसंख्या ३ लाख ५४ हजार ६५२ इतकी असून यामध्ये पुरुष १ लाख ८१ हजार ८९८ तर महिला १ लाख ७२ हजार ७४२ अशी विभागणी आहे.

Leave Your Comments