*अशा होणार जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील लढती :
डहाणू मतदारसंघ : माकप पुन्हा राखणार ?*
*महायुती अंतर्गत डहाणू विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे.भाजपने त्यांच्याकडे अन्य पक्षातून त्यांनीच आयात केलेले अमित घोडा व अन्य उमेदवारांना डावलून आपले जुने कार्यकर्ते विनोद मेढा यांना उमेदवार म्हणून संधी दिली आहे.भाजपाच्या युवा, महिला तसेच विविध संघटनाच्या माध्यमातून मेढा हे आपल्या प्रचाराचा रथ हाकत आहेत.महायुती सरकारची गेल्या अडीच वर्षातील कामगिरी,विशेषत: लाडकी बहिण योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही उल्लेख ते आपल्या प्रचाराच्या दरम्यान करत आहेत.डहाणू व तलासरी तालुक्यातील गाव-पाड्यांमध्ये प्रचार रॅलीद्वारा त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.युवा मोर्चा,महिला तसेच भाजपाच्या विविध आघाड्यांची फळी त्यांच्यासमवेत प्रचारामध्ये सहभागी असते.
महाविकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांनी गाव-पाडा पातळीवरील बैठका,कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी तसेच प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी याद्वारे आपला प्रचार सुरू केला आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे अलीकडेच डहाणू विधानसभा मतदारसंघात ३ लाख ०१ हजार २३९मतदार असून यात महिला मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार ५७८ तर पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४९ हजार ६२७ इतकी आहे या मतदारसंघातील ३३१ मतदान केंद्रापैकी २२३ मतदान केंद्र हे डहाणू तालुक्यातील असून उर्वरित १०८ मतदान केंद्र तलासरी तालुक्यातील आहेत डहाणू विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये भाजपचे पास्कल धनारे यांनी माकपच्या उमेदवाराचा पराभव करत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला होता.मात्र २०१९ च्या निवडणुकीत नाकपनेकाँग्रेस,राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडीची साथ घेत हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणला.यावेळी माकपचे विनोद निकोले निवडून आले. विनोद निकोले आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.तर भाजप महायुतीचे उमेदवार विनोद मेढा हे आहेत.मेढा हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले अमित गोड आहे इच्छुक होते मात्र त्यांना भाजपने संधी दिली नाही पुढे घोडा यांनी पालघरमधून आपली उमेदवारी भरून बंडखोरी केली.मात्र भाजपने त्यांना राजी करून माघार घ्यायला लावली.
या मतदारसंघात ०८ उमेदवार रिंगणात आहेत.यात बहुजन विकास आघाडी,मनसे,वंचित व जिजाऊ पार्टी तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.मात्र येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती म्हणजेच माकप विरुद्ध भाजप,( विनोद निकोले विरुद्ध विनोद मेढा) अशीच लढत होणार आहे या मतदारसंघात २०१९ विधानसभा निवडणुकीत १ लाख ६६ हजार २९ (६१.०२ तर २०२४ लोकसभा निवडणुकीत २ लाख ०९ हजार १० ( ७३.७५ टक्के) इतके मतदान झाले होते.२०२४ च्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीने ८८८ मताची आघाडी घेतली होती. येथे महाविकास आघाडीला ८३ हजार ८२२(४०.१३ टक्के)मते मिळाली होती तर महायुतीला ३ हजार (३९.७१ टक्के)मते मिळाली याव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडीने १२ हजार ७९२ (६.१२ टक्के) इतकी मते घेतली होती तसेच उर्वरित मतदानाचा वाटा १४.०४ टक्के होता. २०१९ विधानसभा निवडणुकीत माकपला ७२११४( ४३.४५ टक्के)मते मिळाली होती. तर भाजप शिवसेना एकत्रित युतीला ६७ हजार ४०७ (४०.६१ टक्के)मते मिळाली होती. दोघांमधील मतांचे अंतर ४ हजार ७०७ इतके होते.या व्यतिरिक्त मनसे ६हजार ३३२ ९(३.८१),वंचित १३८४( २.९१),बसप २ हजार ६७१( १.६१)व नोटा ४ हजार ८२४(२.९१ टक्के) इतका वाटा होता.
२०१९ मध्ये या मतदारसंघात १ लाख ६६ हजार २९ (६१.०२ टक्के) तर २०२४ लोकसभा निवडणुकीत २ लाख ९ हजार ०१० (७३.७५ टक्के) इतके मतदान झाले होते. ३३१ मतदान केंद्र असलेल्या या मतदारसंघाची मतदार संख्या ३ लाख १ हजार २३९ इतकी आहे. यामध्ये पुरुष १ लाख ४९ हजार ६२७ तर महिला मतदार १ लाख ५१ हजार ५७८ इतक्या आहेत.