नवयुग पालघर विशेष : *१६५.६९ कोटींच्या महामार्ग विकास प्रकल्पास प्रारंभ; ५४.७८५ कि.मी.रस्ते सुधारणा, ६८ मोर्‍या व १५ बसस्थानकांची उभारणी*

Date: 2026-02-24
news-banner
नवयुग पालघर विशेष :

*१६५.६९ कोटींच्या महामार्ग विकास प्रकल्पास प्रारंभ; ५४.७८५ कि.मी.रस्ते सुधारणा, ६८ मोर्‍या व १५ बसस्थानकांची उभारणी*

पालघर जिल्ह्यातील  झाई -बोर्डी - तारापूर -पर्नाळी-सफाळे - पारगाव - वरई रा.म. ८ या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामांचे भूमीपूजन आमदार विलास तरे व आमदार राजेंद्रा गावित यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केले.
          या प्रकल्पांतर्गत एकूण ५४.७८५ कि.मी. लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये २६.७१५ कि.मी. नवीन रस्ता बांधकाम, २२.५१० कि.मी. रस्ता नूतनीकरण तसेच ५.५६० कि.मी.काँक्रीट रस्ता बांधकामाचा समावेश आहे. याशिवाय ६८ मोर्‍या, ४ स्लॅब कल्व्हर्ट, ५ लहान पुलांचे बांधकाम आणि ५ अस्तित्वातील मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच ६१ चौकांची सुधारणा, १५ बसस्थानकांची उभारणी, रोड फर्निचरची कामे आणि आवश्यक त्या ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम करण्यात येणार आहे. रस्त्यांची ३ व ७ वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही कंत्राटदाराकडे राहणार आहे.
हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल तत्वावर राबविण्यात येत असून त्यामध्ये ६० टक्के हिस्सा कंत्राटदाराचा तर ४० टक्के हिस्सा शासनाचा आहे. २७ डिसेंबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला असला, तरी बँक हमी व इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत असल्यामुळे प्रत्यक्ष कामास उशिरा सुरुवात होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता कामाला सुरुवात होऊन प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांना चालना देणार्‍या या रस्ता विकास प्रकल्पाला  प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. शासन निर्णय १६ फेब्रुवारी २०१८ अन्वये या प्रकल्पास रु. २५२ कोटी ७७ लाख इतकी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
          पुढे  या प्रकल्पास 
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांच्या  २६ जुलै २०२२ च्या पत्राअन्वये तांत्रिक मान्यता देण्यात आली असून तांत्रिक मान्यता रक्कम रु. १९६ कोटी ३६ लाख ३० हजार ४४३ (स्थापत्य कामे व जीएसटीसह) इतकी आहे.प्रकल्पाची निविदा रक्कम रु. १८४ कोटी इतकी होती; मात्र स्वीकृत निविदा रक्कम रु. १६५ कोटी ६९ लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांच्या २७ डिसेंबर २०२४ या पत्रान्वये निविदा प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली.
Eझ्ण्/प्Aश् श्ळ-१८४/०१ (२०२४-२५) या पॅकेजअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून कामाची मुदत २४ महिन्यांची निश्चित करण्यात आली आहे. या कामाचा ठेका मे.एस.बी. देशमुख (पार्टनर फर्म), ०१, माया, सरस्वती कॉलनी, देवपूर, धुळे (पिन-४२४००५) या संस्थेस देण्यात आला आहे. पंकज सुरेश देशमुख, पवन सुरेश देशमुख व सागर सुरेश देशमुख हे या संस्थेचे भागीदार आहेत.

Leave Your Comments