** महाराजस्व समाधान शिबिर : पालघर जिल्ह्यात
७ मार्चच्या पहिल्याच शिबिरांना मोठा प्रतिसाद**
महसूल विभागामार्फत जिल्ह्यात माहीम, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, चिंचणी, झरी , मांडवी अशा ०८ मंडळाच्या ठिकाणी राबविलेल्या महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे निवारण करुन घेतल्याचे आढळून आले.
पालघर तालुक्यातील माहीम येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. त्यांनी अशा अभियानामुळे प्रशासन व जनतेतील अंतर कमी होण्यास मदत होईल असे सांगितले. या कार्यक्रमास माहीम सरपंच प्रीती पाटील, केळवा सरपंच संदीप किणी, मायखोप सरपंच महेंद्र किणी, ग्रामपंचायतींचे उप सरपंच, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी इंदु राणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपविभागीय अधिकारी मद्नुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार संभाजी पावरा, मंडळ अधिकारी वसावे यांच्यासह तलाठी, ग्राम विकास अधिकारी तसेच अनेक महसूल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ७ मार्च रोजीच्या पहिल्याच शिबिरात विविध स्वरुपात ४ हजार ३३७ इतक्या प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे :-
*अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यायावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या :-पालघर /माहीम ३, तलासरी/झरी १, एकूण ४
* अभियानांतर्गत निकाली काढलेल्या फेरफारांची एकूण संख्या :-पालघर/माहीम ८१, वाडा /कुडूस ४५, विक्रमगड ४१, जव्हार ६२, मोखाडा ३८,तलासरी/झरी ७२, एकूण ३३९
*अभियानांतर्गत अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यायावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या :-पालघर/माहीम १, वाडा /कुडूस १, एकूण २
*अभियानांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या एकूण ८ अ उतार्यांची संख्या:- पालघर/माहीम १२४,वाडा /कुडूस १०५, विक्रमगड ६२, जव्हार १२३, मोखाडा ४२, तलासरी/ झरी ४८, एकूण ५०४
*अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या :-पालघर/माहीम १४७, वाडा/कुडूस १२५, विक्रमगड १०४,जव्हार ६७, मोखाडा १०६, तलासरी/ झरी ७५,एकूण ६२४
*अभियानांतर्गत वितरीत करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या :-पालघर/माहीम २५७, वाडा /कुडूस २५६,विक्रमगड १२३, जव्हार ४५,मोखाडा, २५१,डहाणू/ चिंचणी २४, तलासरी/ झरी २२३:एकूण ११७९
*अभियानांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या डिजीटल ७/१२ ची संख्या :-पालघर माहीम ४१४,वाडा/कुडूस ३१२, विक्रमगड २१८,जव्हार १२३,मोखाडा १८७,तलासरी/झरी ३३७:एकूण १५९१
*अभियानांतर्गत ७/१२ मधील दुरुस्तीसंदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या :-पालघर / माहीम २१,वाडा /कुडूस २३, विक्रमगड १९,जव्हार ५, मोखाडा ७,तलासरी/ झरी १९:एकूण ९४