**पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व वनराई पुरस्कारांचे वितरण**

Date: 2026-04-04
news-banner
नवयुग पालघर विशेष 

**पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व वनराई पुरस्कारांचे वितरण**

           पालघर जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आदर्श ग्रामसेवक (२०२२–२३) म्हणून दिपक बहिरू बेनके (वसई), मेघना मनिष संखे (पालघर), कल्पना विजयसिंह राजपूत (डहाणू), भाऊसाहेब मार्तंड काठे (तलासरी), जान्हवी रुपेश पाटील (वाडा), गणेश सुरेंद्र मंडळ (विक्रमगड), वसंत बुध्या भोरे (जव्हार) व रमेश बाळू गावित (मोखाडा); आदर्श ग्रामसेवक (२०२३–२४) म्हणून स्नेहा मयुर पाटील (वसई), निशिगंधा मयुर पाटील (पालघर), विभूती विलास भोये (डहाणू), उद्धव पांडुरंग म्हेत्रे (तलासरी), प्रतिभा जयराम बरफ (वाडा), संतोष रामचंद्र मिसाळ (विक्रमगड), देविदास चंद्रकांत पाटील (जव्हार) व दिनेशगीर देविदासगीर बावा (मोखाडा); तर आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (२०२४–२५) म्हणून किशोर मुकुंद पाटील (वसई), धनश्री हितेश मोरे (पालघर), मनोज बाबू प्रजापत (डहाणू), नमिता जिव्या वरखंडे (तलासरी), वैशाली भगवान काठोळे (वाडा), जगन्नाथ बबन डोहाळे (विक्रमगड), गणेश भास्कर वारघडे (जव्हार) व योगेश संतोष बागुल (मोखाडा) यांना गौरविण्यात आले. तसेच वनराई उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३८ ग्रामपंचायतींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
             जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          *वनराई उपक्रमात ३८ ग्रामपंचायतींचा सन्मान*

          जलसंधारणाला चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या वनराई उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाला प्रतिसाद देत अनेक ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली. चहाडे ग्रामपंचायतीने सर्वाधिक १५ बंधारे उभारले, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधारे उभारून उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमांतर्गत एकूण ३८ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            तालुकानिहाय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे —
वसई: भाताणे, आडणे, पोमण, 
पालघर: चहाडे, बऱ्हाणपूर अवढाणी, बोरशेती, खानिवडे, चिंचारे, करवाळे, नावझे, हालोली, खडकोली, मनोर, कमारे, खैरे ग्रुप, दहीसर तर्फ मनोर, नंडोरे देवखोप, नवी दापचरी, परनाळी
डहाणू: दाभोण, दिवशी
तलासरी: करंजगाव, वेवजी
वाडा: कॉढले, सापने बु., मोज, हमरापूर, मांडवा, खैरे आंबिवली, ओगदा, शेले, पालसई
मोखाडा: नाशेरा, मोहांडा, बोटोशी
विक्रमगड: आलोंडे
जव्हार: कासटवाडी

       *विकासासाठी समन्वय व संवेदनशील प्रशासनाची गरज*
           यावेळी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करत जिल्ह्यातील कोणताही नागरिक वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे सांगितले. वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणाला चालना मिळून ग्रामीण विकास अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
         आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शाश्वत विकासासाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.
           मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वनराई उपक्रमांतर्गत १००० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात ११२८ बंधारे उभारण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ‘निपुण पालघर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
        कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments