ग्रामीण शिक्षण संस्था उमरोळीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी प्रभाकर पाटील

Date: 2026-08-02
news-banner

नवयुग पालघर

***ग्रामीण शिक्षण संस्था उमरोळीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी प्रभाकर पाटील***

उमरोळी येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रभाकर पांडुरंग पाटील यांची निवड झाली आहे.

कार्याध्यक्षपदी राजेश धर्मराज पाटील, उपाध्यक्षपदी प्रकाश भास्कर घरत, चंद्रकांत दत्तात्रेय पाटील व कमळाकर भाऊ घरत, कार्यवाहपदी भूषण तुकाराम पाटील, सहकार्यवाहपदी अरविंद शांताराम पाटील व अरुण धर्मराज पाटील, तर कोषाध्यक्षपदी किशोर जयराम तरे यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय संस्थेच्या सर्व सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि संस्थेची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave Your Comments