मातोश्रीवर बोईसर विधानसभा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांची भेट**** **पालघरमधील प्रलंबित विकासकामे, पूरस्थिती, शिक्षकांची कमतरता आणि विनाशकारी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा

Date: 2026-08-03
news-banner
नवयुग पालघर
****मातोश्रीवर बोईसर विधानसभा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांची भेट****
**पालघरमधील प्रलंबित विकासकामे, पूरस्थिती, शिक्षकांची कमतरता आणि विनाशकारी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा**

https://youtu.be/xw3TlYkU3Ms?si=DnJsOaKCJoKnVcQR

पालघर | प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच, उपसरपंच आणि विविध पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालघर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पालघर येथील शासकीय रुग्णालय सुरू होण्यास होत असलेला विलंब, पाणीपुरवठा योजनांची रखडलेली कामे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता, सफाळे, मनोर तसेच इतर भागात यंदाच्या पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, तालुक्यात प्रस्तावित विनाशकारी प्रकल्पांना स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणि महावितरणच्या ३३ केव्ही वीजवाहिनीसह वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा बिघाडाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी सर्व विषयांची सविस्तर माहिती घेत संबंधित प्रश्न गांभीर्याने मांडले जातील, असे आश्वासन दिले. तसेच लवकरच शिवसेनेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पालघर तालुक्यात भेट देऊन प्रलंबित विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेईल, अशी माहिती त्यांनी दिली. या सर्व विषयांवर आगामी विधिमंडळ अधिवेशनातही आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालघर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave Your Comments

Trending News