नवयुग पालघर
https://youtube.com/shorts/duz_0EozvN8?si=CNDxKRc9n-vVdAuc
**चारोटी उड्डाणपुलावर रासायनिक टँकर पलटी; चालक किरकोळ जखमी, वाहतूक सुरळीत**
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चारोटी उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) दुपारी २.३० च्या सुमारास गुजरातहून तळोजाकडे जाणारा रासायनिक टँकर पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना कासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टँकरमध्ये कलर व पेंटमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाणारे रेजिन केमिकल होते. सदर रसायन ज्वलनशील नसल्याचे केमिकल तज्ञ गीध यांनी सांगितले आहे.
टँकर सरळ करून बाजूला घेण्यासाठी तीन क्रेनच्या सहाय्याने काम सुरू आहे. टँकर हटवल्यानंतर माती व पाण्याच्या साहाय्याने पुलाची स्वच्छता करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
घटनास्थळी पालघर अग्निशमन दल, डहाणू नगरपरिषद, अदानी थर्मल पॉवर आणि बोईसर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या कार्यरत आहेत. दरम्यान, पुलाखालून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत सुरू असून, सध्या वाहतुकीला कोणतीही अडचण नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
#चारोटी #डहाणू #केमिकलटँकर #पालघर #अपघात #NavyugPalghar
navyugpalghar.com