श्री. स. तु. कदम विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त भक्तिगीतांनी रंगला सांस्कृतिक कार्यक्रम

Date: 2026-09-23
news-banner
***श्री. स. तु. कदम विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त भक्तिगीतांनी रंगला सांस्कृतिक कार्यक्रम***

पालघर : श्री. स. तु. कदम विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कृती व लोकपरंपरांविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) आर्य क्रीडा मंडळ, पालघर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाने झाली. त्यानंतर  विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोककलेचा सुंदर आविष्कार घडवित आधुनिक भारुड सादर केले. मोबाईलच्या आहारी न जाता प्रत्यक्ष जीवनातील नाती, शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदाऱ्या जपण्याचा संदेश भारुडातून प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी गणपती बाप्पांवरील भक्तिगीतांचे गायन केले. ढोलकी, तबला आणि झांज यांच्या साथीने सुमधुर संगीताचे भावपूर्ण सादरीकरण झाल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

प्रसंगी आर्य क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य श्री. व सौ. विनिता अजय राऊत यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते भेटकार्ड देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. तसेच आर्य क्रीडा मंडळाचे सदस्य व ट्विंकल स्टार हायस्कूल, पालघरचे प्राचार्य श्री. केदार महाजन यांचेही भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले. मंडळाचे हितचिंतक व सदस्य म्हणून उपस्थित असलेल्या  महाजन यांच्या मातोश्रींचेही यावेळी स्वागत करण्यात आले. मंडळाच्या सदस्या श्रीमती कामतबाई, सदस्य  राजेंद्र सावे तसेच उपस्थित सर्व सदस्यांचेही स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले. 

 विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. .

navyugpalghar.com
: Facebook | Instagram | YouTube | X | WhatsApp Channel
#नवयुगपालघर #श्रीसतुकदमविद्यालय #हीरकमहोत्सव #पालघर #आर्यक्रीडामंडळ #सांस्कृतिककार्यक्रम #भक्तीगीत #आधुनिकभारुड #विद्यार्थीकलागुण #लोकपरंपरा #गणपतीबाप्पा

Leave Your Comments