स. तु. कदम विद्यालयाचा ‘आदर्श विद्यालय’ म्हणून गौरव

Date: 2026-09-23
news-banner
** स. तु. कदम विद्यालयाचा ‘आदर्श विद्यालय’ म्हणून गौरव**

पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या श्री. स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श विद्यालय’ म्हणून गौरव करण्यात आला. सार्वजनिक भिकल्या धिंडा गणेशोत्सव मंडळ, मासवण यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त १६ सप्टेंबर रोजी तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडका धिंड्या यांच्या हस्ते विद्यालयाला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, वाचन संस्कृती आणि विविध कौशल्यांच्या विकासासाठी विद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला.

या सन्मानामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, संस्थेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मासवण यांचे आभार मानण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश प्रधान, उपमुख्याध्यापक बापूराव थोरात, पर्यवेक्षक दिनेश पारधी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

 navyugpalghar.com
 Facebook | Instagram | YouTube | X | WhatsApp Channel
#नवयुगपालघर #Palghar #आदर्शविद्यालय #श्रीसतुकदमविद्यालय #शैक्षणिकगौरव #पालघर #भिकल्याधिंड्या #शिक्षण #विद्यार्थी #Education #PalgharNews

Leave Your Comments