डहाणू तालुक्यातील वाकी येथे माकपच्या कैनाड विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

Date: 2026-11-03
news-banner

डहाणू तालुक्यातील वाकी येथे माकपच्या कैनाड विभागीय कार्यालयाचे उद्घाटन****


डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाकी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) नव्याने बांधण्यात आलेल्या कैनाड विभागीय कार्यालयाचे उद्घाटन २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सामूहिक नेतृत्वाच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे व मरियम ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, जिल्हा सचिव किरण गहला, तालुका सचिव रडका कलांगडा आणि विभाग सचिव चंद्रकांत घोरखाना उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली.


या नवनिर्मित कार्यालयाला ‘भगतसिंग-बिरसा मुंडा भवन’ असे नाव देण्यात आले आहे. पक्षाचे स्थानिक नेते, सदस्य, हितचिंतक आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून या कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.


या कार्यालयाची इमारत ज्या विस्तीर्ण मैदानावर उभी आहे, ते मैदान यापूर्वी माकपने भूमाफियांविरोधात संघर्ष करून मिळवले होते. सध्या या मैदानाचा क्रीडा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापर केला जात आहे.


कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित सभेनंतर नव्या कार्यालयात माकपच्या ठाणे-पालघर जिल्हा सचिवमंडळाची बैठक पार पडली.

 navyugpalghar.com

 #Dahanu #Waki #CPIM #Palghar #BhagatSingh #BirsaMunda #NavyugPalghar

Follow : F | X | Instagram | YouTube

 

Leave Your Comments