*** डॉ. श्रद्धा सुभाष मोरे : मुंबई विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान विषयात पीएच.डी. प्राप्त***

Date: 2026-07-22
news-banner

नवयुग पालघर

*** डॉ. श्रद्धा सुभाष मोरे : मुंबई विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान विषयात पीएच.डी. प्राप्त***
📚 ५०+ संशोधन निबंध
📖 अनेक तांत्रिक पुस्तकांचे लेखन
🏆 २ पेटंट्स व १ कॉपीराइट
👩‍🏫 १५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव

पालघर : द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय प, मुंबई येथील संगणक अभियांत्रिकी (डेटा सायन्स) विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रद्धा सुभाष मोरे यांनी मुंबई विद्यापीठातून  माहिती तंत्रज्ञान  विषयात पीएच.डी. (Ph.D.) प्राप्त केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या अत्याधुनिक क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

पालघर तालुक्यातील धनसार येथील, डॉ. मोरे यांनी यापूर्वी माहिती तंत्रज्ञान विषयात एम.ई. आणि बी.ई. पदवी संपादन केली असून त्यांना सुमारे १५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई, सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पालघर तसेच युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वसई येथे अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थी मार्गदर्शनाचे उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांचे पीएच.डी. संशोधन कमी क्षमतेच्या संगणकीय उपकरणांवर (Low Computational Devices) जलद, अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने वस्तू ओळखणारी बुद्धिमान प्रणाली (Intelligent Object Detection System) विकसित करण्यावर आधारित असून या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. या कार्यासाठी त्यांना दोन पेटंट्स (Patents) आणि एक कॉपीराइट (Copyright) प्राप्त झाले आहेत.

    डॉ. मोरे यांच्या नावावर ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय वेब टेक्नॉलॉजी , ब्लॉकचेन , इंटरनेट प्रोग्रामिंग , वेब डिझाईन, वेब कम्प्युटिंग  आणि वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट (Web Application Development) या विषयांवरील अनेक तांत्रिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विविध संशोधन प्रकल्पांसाठी त्यांनी संशोधन अनुदाने मिळविली असून उद्योग-शैक्षणिक सहकार्यामध्ये (Industry–Academia Collaboration) त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्या IEEE, ISTE आणि CSI या व्यावसायिक संस्थांच्या सदस्य असून अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

त्या मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रम  निर्मिती समितीच्या सदस्य, प्रश्नपत्रिका निर्मात्या  तसेच विविध स्वायत्त  महाविद्यालयांच्या प्रश्नपत्रिका निर्मात्या म्हणून कार्यरत आहेत. देशातील विविध विद्यापीठे व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्यांनी तज्ज्ञ व्याख्याता , संसाधन व्यक्ती , परीक्षक  आणि संशोधन मार्गदर्शक  म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांनी NPTEL, IITs, AICTE-ATAL, Coursera, AWS Academy, Google, Microsoft Azure, IBM, edX आदी प्रतिष्ठित संस्थांकडून ५० हून अधिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षक विकास कार्यक्रम (FDP), STTP आणि कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून NPTEL Discipline Star Award ने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्या IEEE, ISTE आणि CSI यांसारख्या व्यावसायिक संस्थांच्या सदस्य असून संशोधन व तांत्रिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

डॉ. मोरे या इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेट्रॉनिक्स ( IEEE ) इंडिअन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन(ISTE ) आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (CSI) या व्यावसायिक संस्थांच्या सदस्य असून संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

अध्यापन, संशोधन, नवोपक्रम  आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. श्रद्धा सुभाष मोरे यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधन, 
उच्च शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडविण्यासाठी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. मोरे यांचे हे यश पालघर जिल्ह्यासाठीही अभिमानास्पद आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐

#नवयुगपालघर #DrShraddhaMore #PhD #MumbaiUniversity #DJSCE #AI #MachineLearning #DeepLearning #Research #Palghar #Education #Achievement















Leave Your Comments