टिमातर्फे ६५ शाळांतील १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; जिल्हा प्रथम शौर्या ठाकूरसह द्वितीय आर्या कुलकर्णीचा गौरव

Date: 2026-07-31
news-banner
नवयुग पालघर
****टिमातर्फे ६५ शाळांतील १३० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; जिल्हा प्रथम शौर्या ठाकूरसह द्वितीय आर्या कुलकर्णीचा गौरव****

तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (TIMA) तर्फे एसएससी परीक्षा २०२६ मध्ये पालघर तालुक्यातील ६५ शाळांमधील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त १३० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. टिमा सभागृहात झालेल्या या सत्कार सोहळ्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारी शौर्या विजय ठाकूर (९७.४० टक्के, ट्विंकल स्टार इंग्लिश हायस्कूल) तसेच द्वितीय क्रमांक मिळवणारी आर्या मंदार कुलकर्णी (९६.६० टक्के, तारापूर विद्या मंदिर) यांचाही समावेश होता.

तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (TIMA) तर्फे आयोजित एसएससी टॉपर सत्कार सोहळा २०२६ टिमा सभागृहात उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पालघर तालुक्यातील ६५ शाळांमधील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या एकूण १३० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ₹५,०००, तर द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ₹३,००० रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि शालेय दप्तरही भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले.

यावेळी टिमाचे अध्यक्ष डी. के. राऊत, सल्लागार वेलजी गोगरी, उपाध्यक्ष पापा ठाकूर व निलेश पाटील, सचिव एस. आर. गुप्ता, खजिनदार संदीप सावे, रवी भावसार, ॲड. कल्पेश जगदीश धोडी (कायदा व सुव्यवस्था समिती अध्यक्ष), अभिजित गोळे, अविनाश बियाणी, एस. एल. शर्मा तसेच सत्कार समिती आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही टिमाची सामाजिक बांधिलकी असून, असे उपक्रम पुढेही सुरू राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.

*English News*
****TIMA Felicitates 130 Merit Students from 65 Schools; District Topper Shourya Thakar Among Awardees****

The Tarapur Industrial Manufacturers Association (TIMA) organised the SSC Topper Felicitation Ceremony 2026 to honour 130 students who secured the First and Second Rank in their respective schools across 65 schools in Palghar Taluka. The awardees included District Topper Miss Shourya Vijay Thakar (97.4%) of Twinkle Star English High School and Miss Aarya Mandar Kulkarni (96.6%) of Tarapur Vidya Mandir, who secured the second rank.

The Tarapur Industrial Manufacturers Association (TIMA) organised the SSC Topper Felicitation Ceremony 2026 at the TIMA Auditorium to recognise academic excellence among students of Palghar Taluka.

Students securing the first rank were presented with a cash prize of ₹5,000, while second-rank holders received ₹3,000. All awardees were also presented with a Certificate of Appreciation and a school bag in recognition of their academic achievements.

The ceremony was graced by Dr. Kiran Save, Principal of Sonopant Dandekar College, as the Chief Guest. He congratulated the students and encouraged them to continue striving for excellence through dedication and perseverance.

The event was attended by Mr. D. K. Raut (President, TIMA), Mr. Velji Gogri (Advisor), Mr. Papa Thakur and Mr. Nilesh Patil (Vice Presidents), Mr. S. R. Gupta (Secretary), Mr. Sandip Save (Treasurer), Mr. Ravi Bhavaskar, Adv. Kalpesh Jagdish Dhodi (Chairman – Law & Order Committee), Mr. Abhijeet Gole, Mr. Avinash Biyani, Mr. S. L. Sharma, along with members of the Felicitation Committee and the Managing Committee.

The programme witnessed enthusiastic participation from students and parents. Reaffirming its commitment to promoting education and encouraging young achievers, TIMA stated that such initiatives will continue to remain an integral part of its social responsibility.

Leave Your Comments