पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर*

Date: 2026-09-16
news-banner

नवयुग पालघर
**पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर**

पालघर, दि. ११ सप्टेंबर २०२६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ४७९ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील १० हजार ४८४ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत ४७९ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
जाहीर झालेल्या २३१ याद्यांमध्ये या पात्र शेतकऱ्यांची नावे असून, संबंधित सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालये, तालुका निबंधक कार्यालये, बँक शाखा आणि चावडी येथे या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले आहे.

Leave Your Comments