*निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवसाकरता जिल्ह्याची सर्व यंत्रणा सज्ज...*

Date: 2024-11-19
news-banner
*निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवसाकरता जिल्ह्याची सर्व यंत्रणा सज्ज...*

        *पालघर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघात १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांसाठी आवश्यक साधन सामुग्री पाठविण्यासाठी Dispatch Centre वर विविध सुविधांसह अधिकारी/कर्मचारी नियुक्त्या, पोलीस बंदोबस्त, इतर कार्यालयाचे सहकार्य आदी व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

1. टपाली मतपत्रिका स्विकारणेकरीता VOTER FACILIATION CENTRE तयार करण्यात आलेले आहे.

2. राज्य परिवहन महामंडळाच्या(एसटी) २७१ बसेसची व्यवस्था -

3. खाजगी जीप, ऑटो, बसेसची ४७१ जीप व ऑटो तसेच १९२ खाजगी बसेस 

4. जलवाहतुकीसाठी ८ बोटी

 आवश्यक सेवा सुविधांकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर, अग्निशमन विभाग, BSNL, MSEB, परिवहन महामंडळ, डाक विभाग, कोस्ट गार्ड, खाजगी मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी आदी इतर विभागाच्या सेवा प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

       मतदान समाप्त होण्यापुर्वी ४८ तासांच्या कालावधीत प्रचार मोहिमेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रचार कालावधी समाप्त झाल्यानंतर राजकीय कार्याधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील उपस्थिती बाबत निर्बंध असतील. प्रचार कालावधी समाप्त झाल्यानंतर असे सर्व कार्याधिकारी मतदारसंघ ताबडतोब सोडून जातील.


        अधिकारी/कर्मचारी नियुक्त्या :

        विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुसार मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई आदी मिळून १२६२७ ( शासकिय / निमशासकिय कार्यालयातील) एकूण १२६२७ अधिकारी/ कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असुन त्यांचे दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत.

          पोलीस बंदोबस्त -

            विधानसभा  निवडणूक प्रक्रिया सुलभ, शांततेत व निर्भयपूर्व वातावरणात पूर्ण व्हावी याकरीता पालघर जिल्हयात २७८२ पोलीस अधिकारी/ कर्मचारी, २०४१ होमगार्ड व CISF व SRPF च्या ०८ कंपनी नियुक्त करण्यात आले आहेत.

Leave Your Comments