मतदानाचा हा वाढीव टक्का कोणाचा घात करणार आणि कोणाला हात देणार ?

Date: 2024-11-22
news-banner
        लोकसभा २०२४ आणि विधानसभा २०१९ निवडणुकीच्या तुलनेत, मतदानाचा, हा वाढीव टक्का कोणाचा घात करणार आणि कोणाला हात देणार ?

         विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून ६६.६३% इतके मतदान झाले असून २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान ०२.७२ टक्क्यांनी जास्त आहे तर, २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ०७.६८ टक्क्यांनी जास्त आहे.
        *विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास, डहाणू विधानसभा मतदारसंघात २०२४ लोकसभा निवडणुकीत झालेले ७३.७५ टक्के मतदान लक्षात घेता, आताच्या ७३.३४ च्या तुलनेत ०.४१ इतके मतदान कमी झाले आहे. मात्र २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान १२.३२टक्के इतके जास्त आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत येथे ६१.०२ इतकेच मतदान झाले होते. 
       *विक्रमगड विधानसभेत देखील यावेळी २०२४ लोकसभेच्या तुलनेत ३.५०% इतके मतदान जास्त झाले आहे.त्यावेळी या मतदारसंघात ७४.४५ % इतके मतदान झाले होते. तर विधानसभा निवडणूक २०१९ मधील ६८.५१ च्या तुलनेत या वेळचे मतदान तब्बल ९.४४% टक्क्यांनी जास्त आहे.
          *पालघर विधानसभेत यावेळी, २०२४ लोकसभेच्या तुलनेत केवळ पॉईंट ०१.२४ टक्के इतकी वाढ आहे. २०१९ विधानसभेच्या निवडणुकीची ४७.११ ही टक्केवारी लक्षात घेता यावेळीची वाढ तब्बल २४.४७ टक्क्यांनी जास्त आहे. यावेळी या मतदारसंघात ७१.५८ इतके मतदान झाले आहे.            
            *बोईसर विधानसभा मतदारसंघातील मतदान यावेळी ६७.५० टक्के इतके झाले असून २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान ०२.८४ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र विधानसभा २०१९ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६७.६० टक्के इतके मतदान झाले होते.या तुलनेत यावेळचे मतदान ००.१० ने  कमी आहे.                            *नालासोपारा विधानसभा मतदारसंघात २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी, ०५.०३ टक्के इतकी मतदानात वाढ झाली असून २०१९ विधानसभेच्या तुलनेत ही वाढ ०५.५४ टक्के इतकी आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ५२.३४ तर विधानसभा निवडणुकीत येथे ५१.८३ % इतके मतदान झाले होते.
          *वसई विधानसभा मतदारसंघात २०२४ लोकसभा निवडणुकीत ५९.१२ टक्के इतके मतदान झाले होते. यावेळच्या  ६१.४९ च्या तुलनेत हे मतदान २.३७ ने जास्त आहे. तर २०१९ विधानसभा निवडणुकीतील ६२.५६ टक्के  इतके झालेले मतदान लक्षात घेता, यावेळचे ६१.४९ टक्के  हे झालेले मतदान १.०७ टक्क्यांनी कमी आहे.
            वरील मतदानाचे चित्र यावेळी डहाणू विधानसभा मतदारसंघात लोकसभा २०२४ च्या तुलनेत मामुली ०.४१ टक्क्यांची तर २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत देखील बोईसर विधानसभा मतदारसंघात मामुली ०.१० टक्क्यांची व २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ०१.०७ टक्क्यांची घट दर्शविते. हे तीन अपवाद वगळता,२०१९ विधानसभा व २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अन्य सर्व मतदारसंघात मतांचा टक्का वाढलेला आहे.साहजिकच हा वाढलेला टक्का प्रत्यक्ष निकालात कोणाचा घात करणार आणि कोणाला हात देणार, हे निकालानंतरच दिसेल.

Leave Your Comments