धनादेश न वटल्यास (चेक बाउन्स) : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक निकाल

Date: 2025-08-07
news-banner

              धनादेश न वटल्या (चेक बाउन्स) प्रकरणात तक्रार जिथे चेक सादर केला गेला त्या ठिकाणी नव्हे, तर जिथे धनादेशधारकाचे /    रक्कम प्राप्त करणाऱ्या  व्यक्तीचे (Payee) बँक खाते आहे तिथेच दाखल करता येईल: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक निकाल

               सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केलं आहे की, धनादेश (चेक) वटला नाही (बाउन्स झाला) अशा प्रकरणांमध्ये फौजदारी तक्रार (धारणा १३८ नुसार) ही केवळ त्या ठिकाणी दाखल करता येईल जिथे ‘धनादेशधारकाचे’ म्हणजेच(रक्कम प्राप्त करणाऱ्या  व्यक्तीचे Payee)बँक खाते आहे, आणि धनादेश (चेक) प्रत्यक्ष सादर केलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी नाही.

न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, "तक्रारीसाठी क्षेत्राधिकार (jurisdiction) निश्चित करताना फक्त     धनादेशधारकाचे’ म्हणजेच(रक्कम प्राप्त करणाऱ्या  व्यक्तीचे Payee)  बँक खाते जिथे आहे त्यालाच महत्व आहे.धनादेश( चेक) कुठे सादर केला गेला किंवा कुठे वटण्याचा प्रयत्न केला गेला, याला महत्त्व नाही."

हा निर्णय "Negotiable Instruments Act, 1881" मधील कलम 138 अन्वये दाखल होणाऱ्या तक्रारींच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पूर्वी अनेक वेळा असा गोंधळ निर्माण होत होता की तक्रार कोणत्या ठिकाणी दाखल करावी – धनादेश(चेक) जिथे बाउन्स झाला त्या बँकेच्या शाखेच्या ठिकाणी, की     धनादेशधारकाचे’ म्हणजेच(रक्कम प्राप्त करणाऱ्या  व्यक्तीचे Payee)   राहत्या पत्त्यावर, की अन्य कोणत्या ठिकाणी.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता स्पष्टता आली असून, पुढे जाऊन अशा प्रकरणांमध्ये अनावश्यक न्यायालयीन संघर्ष, उशीर आणि क्षेत्राधिकाराच्या वादांपासून दिलासा मिळणार आहे.









Leave Your Comments