✨ साहित्यप्रेमींसाठी अनोखी मेजवानी : ना. धों. महानोर यांच्या कविता, वाङ्मय मंडळ उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशन असा बहारदार संगम! ✨ *शनिवार, २३ ऑगस्ट दुपारी 2.०० वाजता * ठिकाण : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,पालघर

Date: 2025-08-20
news-banner
✨ साहित्यप्रेमींसाठी अनोखी मेजवानी : ना. धों. महानोर यांच्या कविता, वाङ्मय मंडळ उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशन असा बहारदार संगम! ✨
    *शनिवार, २३ ऑगस्ट दुपारी 2.०० वाजता *
     ठिकाण : सोनोपंत दांडेकर                                                  महाविद्यालय,पालघर

              पालघर : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि वाचनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यप्रेमींसाठी एक देखणा आणि अभिजात सोहळा रंगणार आहे. कविता, वाङ्मय आणि पुस्तक प्रकाशन यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम रसिकांना अविस्मरणीय ठरणार आहे.

या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरणार आहे ना. धों. महानोर यांच्या निसर्गकवितांची मैफल, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे रसिकांसमोर महानोरांच्या  कविता सादर करणार आहेत. महानोरांच्या काव्यातील निसर्गाची हाक आणि ग्रामीण जीवनाची उबदार झलक या मैफलीतून अनुभवता येईल.

या अनुषंगाने सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रवासाची नवी दारे या वेळी खुली होतील.

साहित्यसंध्येचा तिसरा भाग असेल पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी! सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक व अनुजा अवकाश केंद्राचे संस्थापक चंद्रकांत घाटाळ यांचे प्रभावी लेखन असलेले 
“बिन आडनावाची पोरी” तसेच 
“अनुराधा इंदुलकर” या दोन पुस्तकांचा 
प्रकाशन सोहळा यावेळी होणार आहे

📢 सर्व साहित्यरसिकांनी या बहारदार आणि बहुआयामी कार्यक्रमाला उपस्थित राहून या समृद्ध अनुभवाची साक्षीदार व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.

Leave Your Comments