जव्हार येथील नवीन न्यायालयीन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते व न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे, न्यायमुर्ती अद्वैत सेठना या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत जिल्हा व सत्र न्यायालय ठाणेचे न्यायाधीश श्रीनिवास

Date: 2025-08-09
news-banner
               जव्हार येथील सध्याची न्यायालयीन इमारत मोडकळीस आल्याने तसेच अपुरी पडत असल्याने न्यायालयाची नवीन इमारत उभी राहिली आहे. या नवीन न्यायालयीन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते व न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे, न्यायमुर्ती अद्वैत सेठना या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत  जिल्हा व सत्र न्यायालय ठाणेचे न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. ३३३.६० चौ.मी. क्षेत्रफळ भूखंडावर उभी असलेली १९३४ मध्ये बांधलेली सध्या अस्तित्वात असलेली   न्यायालयीन इमारत त्याकाळी, जव्हार संस्थानिकांनी न्यायालयाकरीता दिली होती.
               सध्याची ही जागाही पुरेशी नसल्याने नवीन न्यायालयीन इमारत बायपासरोडवरील आडखडक गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरातील भूखंडावर बांधण्यात आली आहे. दोन न्यायदान कक्षांची ही न्यायालयीन इमारत भविष्यातील वरीष्ठ स्तराचे न्यायालय निर्माण झाल्यास व पर्यायाने न्यायायाधीशांची संख्या वाढल्यास उपयुक्त ठरेल. परिणामी ह्या दुर्गम आदिवासी भागातील पक्षकारांना न्यायिक कामासाठी सध्या भिवंडी येथे जावे लागते, ती अडचण दूर होऊ शकेल.   
                  जव्हार व परिसरातील जनता, पक्षकार, वकील, न्यायाधीश तसेच न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी आदी सर्वांसाठी रविवार १० ऑगस्ट हा दिवस आनंद व समाधानाचा दिवस असेल..

Leave Your Comments