पालघर नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना जाहीर,१५ प्रभाग ३० सदस्य, पैकी १६ महिलांसाठी आरक्षित

Date: 2025-08-19
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar विशेष :

निवडणूक विभागामार्फत, पालघर नगरपरिषद(जिल्हा पालघर) सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना नागरिकांकडून सूचना/तक्रारींसाठी प्रसिद्ध केली आहे. (Draft Ward Formation) २०११ च्या ६८,९३० या लोकसंख्येच्या आधारे सरासरी ४५९५ लोकसंख्या धरून प्रभाग बनविण्यात आल्याचे यात म्हटलेले आहे. दोन सदस्य मिळून १ प्रभाग, असे धरून १५ प्रभागासाठी ३० सदस्य असतील. ३० पैकी एक जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आहे, ४ जागा अनुसूचित जमाती अर्थात आदिवासीसाठी आरक्षित असून पैकी २ आदिवासी महिला साठी आरक्षित आहेत, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)अर्थात इतर मागासवर्गीयसाठी ८ जागा आरक्षित आहेत, पैकी ४ जागा नामाप्र महिलासाठी आरक्षित आहेत.उर्वरित १७ जागा सर्वसाधारण म्हणजे खुल्या असतील, मात्र यातील ९ महिलासाठी आरक्षित असतील. म्हणजेच विविध प्रवर्गातून  ३० पैकी १५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.....

        परिशिष्ट – १ : एकूण माहिती
नगरपरिषद क्षेत्राची एकूण लोकसंख्या (२०११ जनगणना) : ६८,९३०

अनुसूचित जाती लोकसंख्या (SC) : ३४१९

अनुसूचित जमाती लोकसंख्या (ST) : ९७२०

एकूण नगरसेवक (सदस्य) संख्या : ३०

प्रभाग प्रकार :

द्वि-सदस्यीय (२ सदस्य असलेले) प्रभाग – १५

त्रि-सदस्यीय प्रभाग – ०

प्रभागाची सरासरी लोकसंख्या : ४५९५

परिशिष्ट – २ : प्रभागांची नावे, व्याप्ती व लोकसंख्या
प्रभाग क्रमांक १
लोकसंख्या : ४४०९ (SC – ७५, ST – ३६२)

मुख्य क्षेत्रे : गांधी नगर, जैन मंदिर, हिंदु स्मशानभूमी, डुंगीपाडा, कब्रस्तान, MSEB ऑफिस, मच्छीमार्केट चौक, चाररस्ता पोलीस चौकी,शासकीय रेस्ट हाऊस

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक २
लोकसंख्या : ४७९७ (SC – २७७, ST – १४८३)

मुख्य क्षेत्रे : जिल्हा परिषद शाळा वेवूर, गणेश नगर, जुने GST कार्यालय, शक्ती उद्योग औद्योगिक वसाहत, घोलवीरा, विरेंद्र नगर.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ३
लोकसंख्या : ४८३० (SC – २६७, ST – १२९१)

मुख्य क्षेत्रे : सेंट् जॉन्स कॉलेज, वन विभाग कार्यालय, भेंडी पाडा ग्राऊंड, जीवनज्योत हॉस्पिटल, हनुमान टेकडी, साई मंदिर,पृथ्वी आनंद वसाहत, पुनम पार्क वसाहत .

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ४
लोकसंख्या : ४५६३ (SC – ५५९, ST – ३७६७)

मुख्य क्षेत्रे : डॉ. आंबेडकर नगर, नवली, इस्कॉन मंदिर, सिद्धी विनायक रेसिडेन्सी वसाहत.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ५
लोकसंख्या : ५०३३ (SC – ४८, ST – १२०)

मुख्य क्षेत्रे : गणेशकुंड, धनानी मोटर्स, रामकृष्ण गार्डन, रिलायन्स मॉल, नानीवडेकर हॉस्पिटल, IDBI बँक, हुतात्मा चौक,पालघर मेडिकल स्टोअर्स इमारत, कुंती पार्क .

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ६
लोकसंख्या : ४७१५ (SC – ६८, ST – ४२१)

मुख्य क्षेत्रे : जुना पालघर, आगरीपाडा, देवीसहाय रोड,गावदेवी,आंबेवाडी, किणी नगर, शुक्ला कंपाऊंड, ट्विंकल स्टार शाळा.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ७
लोकसंख्या : ४१८८ (SC – ३६८, ST – १२५२)

मुख्य क्षेत्रे : एस.टी. वर्कशॉप, ढवळे हॉस्पिटल, जीवन विकास शाळा, गोठणपूर, कॉलेज रोड, आनंदाश्रम शाळा, अयप्पा मंदिर, पिलेना नगर, जि. प.शाळा गोठणपूर.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ८
लोकसंख्या : ४८८३ (SC – २०३, ST – ५४९)

मुख्य क्षेत्रे : अल्याळी गाव, बंधन रिसॉर्ट,गणेश नगर, टेंभोडे गाव, चाफेकर कॉलेज, दांडेकर कॉलेज, हावरे वसाहत.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ९
लोकसंख्या : ४३८९ (SC – ३९९, ST – ५०३)

मुख्य क्षेत्रे : नवापाडा, वळणनाका, शिक्षक पतपेढी, हिंदवी मैदान, अल्याळी औद्योगिक वसाहत.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक १०
लोकसंख्या : ४८२८ (SC – १२१, ST – १७७)

मुख्य क्षेत्रे : होलिस्पिरिट हायस्कूल, फिलिया हॉस्पिटल, एचडीएफसी बॅक , वृंदावन पार्क वसाहत, अष्टविनायक गार्डन, साईनगर 

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक ११
लोकसंख्या : ४२५६ (SC – २१८, ST – २१४)

मुख्य क्षेत्रे : वीर सावरकर चौक, नाना-नानी पार्क, क्रोमा, कुलदीप नगर, विष्णूनगर वसाहत .

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक १२
लोकसंख्या : ४३७४ (SC – १८४, ST – २४७)

मुख्य क्षेत्रे : आर्यन हायस्कूल ग्राउंड, मिडल क्लास सोसायटी, कमला पार्क, संखे कॉलनी, विजय नगर,मेघना नर्सिंग होम, चिंतामणी अपार्टमेंट, वैष्णवी अपार्टमेंट, श्रीराम नगर, गंगा अपार्टमेंट, जानकी अपार्टमेंट.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक १३
लोकसंख्या : ४६५७ (SC – १९२, ST – ३०६)

मुख्य क्षेत्रे : शुक्ला कंपाऊंड, हुतात्मा स्तंभ,तिवारी कंपाऊंड, लायन्स क्लब इमारत, वाजपेयी वाडा, आर्यन स्कूल, ग्रामीण रुग्णालय, स्टेट बँक, प्रकाश टॉकीज.

सदस्य संख्या : २

प्रभाग क्रमांक १४
लोकसंख्या : ४४८० (SC – २३०, ST – ८७२)

मुख्य क्षेत्रे : नवली तलाव, नवल नगर, भोगोले पाडा, वृंदावन, विवा स्वरगंगा वसाहत, रेल्वे लाईन, रेल्वे कॉलनी, रेल्वे सब पॉवर स्टेशन, शापरिया रो हाऊस, लोकमान्य नगर.

सदस्य संख्या : २
प्रभाग क्रमांक १५
लोकसंख्या : ४५२८ (SC – २१०, ST – ११५६)
मुख्य क्षेत्रे : उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालय, आदिवासी मुलांचे वस्तीगृह, जिल्हा न्यायालय, स्टेट जीएसटी कार्यालय, आयकर विभाग.
सदस्य संख्या : २

परिशिष्ट – ३, ४ :
प्रभागनिहाय जनगणना प्रगणक गट (Enumeration Blocks) व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) लोकसंख्येचे तपशील दिलेले आहेत.
याअंतर्गत प्रत्येक Enumeration Block कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे हे नमूद आहे.
 थोडक्यात सांगायचे तर : पालघर नगरपरिषदेसाठी ३० सदस्यीय (१५ द्वि-सदस्यीय प्रभाग) रचना केली असून, प्रभागनिहाय लोकसंख्या साधारण ४३८० ते ५०३० दरम्यान ठेवलेली आहे.

Leave Your Comments