नवयुग पालघर Navyug Palghar Weekly: विशेष बातमी : *डहाणू नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना*

Date: 2025-08-19
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly: विशेष बातमी :
         *डहाणू नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना*

          डहाणू नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने अलीकडेच प्रारूप  प्रभाग रचना जाहीर केली असून, या संदर्भात नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. दोन सदस्यीय १२ व तीन सदस्यीय ०१ मिळून २७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.
         खाली प्रभाग रचनेचे स्वरूप, प्रत्येक प्रभागात समाविष्ट प्रमुख भाग, लोकसंख्या याची माहिती खालील प्रमाणे : 

****डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक  २०२५

१. नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या : ५०,२८७
(२०११ च्या जनगणनेनुसार)
२. अनुसूचित जातीची एकुण लोकसंख्या : २४७१
३. अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या : ९३२३
४. निवडून द्यावयाच्या नगरपरिषद सदस्यांची संख्या : २७
५. प्रभागांची एकूण संख्या
दोन सदस्यीय प्रभाग/ तीन सदस्यीय प्रभाग
          १२    (२४)    /          ०१(०३)

**प्रभाग क्रमांक १
लोकसंख्या एकूण : ३५९६ (अ.जा. ३१९ / अ.ज. १८०७)
नाव : आगर, आंबेमोरा, मसोली रोहिदास नगर, प्रभुपाडा

व्याप्ती :
आगर, आंबेमोरा, मसोली प्रभुपाडा, मसोली घाचीयापाडा, चोखारवाडा, मसोली रोहिदासनगर, गेट नं. ५७
निवडून द्यावयाचे सदस्य : २

**प्रभाग क्रमांक २
लोकसंख्या : ३६२२ (अ.जा. ७५८ / अ.ज. ६०)
नाव : मल्याण, ईराणी रोड, आंबेडकर नगर

व्याप्ती :
जुनी नगरपालिका, पोस्ट ऑफिस, खरे कंपाऊंड, वैभव कॉम्प्लेक्स, शाम अपार्टमेंट, मच्छी मार्केट, वसंत सरिता, रुस्तम बाग, मुकबधीर शाळा, बुद्धदेव नगर, आंबेडकर नगर, HMP हायस्कूल, रिलायन्स मॉल, सरोवर हॉटेल
सदस्य : २

**प्रभाग क्रमांक ३
लोकसंख्या : ३९७९ (अ.जा. १२४ / अ.ज. ५६४)
नाव : मल्याण पूर्व पटेलपाडा

व्याप्ती :
पटेलपाडा, फ्रिडम क्लब, बमन एन्टरप्रायजेस, वाघ्या बाबा मंदिर, तलाठी कार्यालय मल्याण पूर्व, बालाजी अपार्टमेंट
सदस्य : २

**प्रभाग क्रमांक ४ : प्रभागाचे नाव : मल्याण पूर्व रामटेकडी
लोकसंख्या एकूण :- ३७९०
(अ. जा.: १९२ / अ. ज.: ५९६)

व्याप्ती :
पूर्व रामवाडी, रामजी अपार्टमेंट, छत्री कंपाऊंड, पेट्रोल पंप, डहाणूकर बंगला, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, इंटिग्रेट कॉलनी, धान्य गोडाऊन, गोपीपुरा
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक ५ : सरावली – मानफोडपाडा,तलावपाडा,संजय नगर (तीन सदस्यीय प्रभाग)
लोकसंख्या एकूण :- ५७९३
(अ. जा.: २७२ / अ. ज.: २२९१)

व्याप्ती :
 भरवाडपाडा, संजयनगर, शिवाजीनगर, अॅल्युमिनियम कंपनी, गार्डन पॅलेस, सरावली जकातनाका, गुजराती शाळा, मानवोडपाडा, बोहलीपाडा, तलावपाडा, सुमडीपाडा, खेवरचंद वाडी, मनोहर इंडस्ट्रीज, बाफनावाडी, लेपरसी कॉलनी, मिठागरे
सदस्य : ०३

**प्रभाग क्रमांक ६ : नहारनगर – ब्राम्हणपाडा – लोणीपाडा
लोकसंख्या एकूण :- ३६६४
(अ. जा.: ८३ / अ. ज.: ६३८)

व्याप्ती :
ब्राम्हणपाडा, भूमी, काटीर रोड, लोणीपाडा, रेल्वे वसाहत, नहारनगर
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक ७ : मल्याण पश्चिम – केटीनगर – विद्युत नगर
लोकसंख्या एकूण : ४०३८
(अ.जा. २०१ / अ.ज. ३८५)

व्याप्ती :
केटीनगर, दक्षश्री माळी हॉल, ईडन गार्डन, एसटी डेपो, विद्युत नगर, कावाजी चाळ, स्टेट बँक, माच्छीवाडा, इराणी हॉस्पिटल, पुष्पलता पार्क, वडकून नाका-पालेवाडी, ओला शोरूम, दीपक बेकरी, सरदार कॉलनी
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक ८ : आगर
लोकसंख्या एकूण : ३५८०
(अ.जा. ७२ / अ.ज. ७९८)

व्याप्ती :
आगर, माच्छीवाडा, दुर्गाआळी, केवडादेवी मंदिर, वावर पाडा, ताडगुड, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, कॉटेज हॉस्पिटल, फॉरेस्ट ऑफिस, हॉटेल बीच क्लासिक, हॉटेल परलाईन, पारनाका पोलीस चौकी
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक ९ : मसोली – पारनाका
लोकसंख्या एकूण : ४०९०
(अ.जा. १०७ / अ.ज. ६८०)

व्याप्ती :
मसोली साईबाबा मंदिर, सेंट मेरीज हायस्कूल, महावीर कॉम्प्लेक्स, मसोली बारीवाडा, अंबिका गॅस एजन्सी, गजानन महाराज मंदिर, पोंदा हायस्कूल, सागर दर्शन, पोर्णिमा टॉकीज, भूमी अभिलेख कार्यालय,निधी अपार्टमेंट, विजय पार्क, वाटिका अपार्टमेंट, चंद्रनगर
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक १० : डहाणू गाव – बंदर रोड
लोकसंख्या : ३५३९
(अ.जा. ९७ / अ.ज. २०७)

व्याप्ती :
दिवाणी न्यायालय, जैन मंदिर, कबरस्तान, दुबळपाडा, तन्ना डिस्पेनसरी, नगीना मशिद, पोस्ट ऑफिस, बंदर रोड, हनुमान मंदिर, ठाणे बँक, जयराज अपार्टमेंट, दत्ता मंदिर, आझाद लेन, जुम्मा मशिद,डहाणू गाव मच्छी मार्केट,राणा गणपती कारखाना
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक ११ : डहाणू गाव – दिवादांडी
लोकसंख्या : ३६३२
(अ.जा. ७३ / अ.ज. ५३४)

व्याप्ती :
दुबळवाडा, कीर्तनी बंगला, गावदेवी मंदिर, डहाणू गाव स्मशानभूमी, बर्फाचा कारखाना, तहसील कार्यालय, दिवा दांडी, डहाणू फोर्ट, मांगेलवाडा, ब्राम्हण आळी, गणपती मंदिर, कुंभार वाडा, पोलीस वसाहत, स्वाध्याय मंदिर, भारतीय तटरक्षक कार्यालय
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक १२ : वडकून – पाटीलपाडा – चिमणीपाडा
लोकसंख्या : ३४२३
(अ.जा. २३ / अ.ज. ३९४)

व्याप्ती :
वडकून, वडकून इंडस्ट्रीज,पाटील पाडा, वडकून कॉलेज, मसोली नाका, तारा कॅसल, चौधरी अपार्टमेंट, बाळकृष्ण अपार्टमेंट, अमेय विला, पारेख कुटीर, चिमणीपाडा, साईभक्ती अपार्टमेंट, पांचाल समाज हॉल
सदस्य : ०२

**प्रभाग क्रमांक १३ : लोणीपाडा – अदानी पॉवर स्टेशन कॉलनी
लोकसंख्या : ३५४१
(अ.जा. १५० / अ.ज. ३६९)

व्याप्ती :
लोणीपाडा, कुंकुवाडी,  कम्युनिटी हॉल, अदानी पॉवर स्टेशन कॉलनी
सदस्य : ०२
(अधिकृत प्रभाग रचना अधिसूचना,, डहाणू नगरपरिषद कार्यालय व संकेतस्थळावर उपलब्ध आहे)

Leave Your Comments