https://drive.google.com/file/d/1G2PqWbpBBlNmrb44IWdf5kP5wGwfMKlu/view?usp=drivesdk
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly विशेष बातमी
तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण वायुगळती; चार कामगारांचा मृत्यू, दोन अत्यवस्थ
तारापूर प्रतिनिधी – तारापूर औद्योगिक क्षेत्र हादरवून सोडणाऱ्या भीषण दुर्घटनेत गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट 2025) दुपारी ४.०० वाजता मेडली फार्मासिटिकल्स लि. या कंपनीमध्ये वायुगळती होऊन, कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती व कमलेश यादव या चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहन शिंदे व निलेश हाडळ या दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना प्लॉट क्र. एफ-१३ मधील नायट्रोजन रिऍक्शन टॅंकमध्ये झालेल्या गळतीमुळे घडली. दुसऱ्या पाळीत कामावर दाखल झालेल्या या सहा कामगारांना काही क्षणांतच वायूचा प्रादुर्भाव झाला. त्यातील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन कामगार श्वसनास अडचणी जाणवताच तातडीने बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या दोघांनाही अतिदक्षता विभागात (ICU) उपचार दिले जात असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे.
या दुर्घटनेने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे...