https://drive.google.com/file/d/1Y3UbgwZ1lVgzCqGjsTimgGA6XQQsAzZj/view?usp=drivesdk
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly विशेष बातमी :
प्रशासकीय काळात कोणतंही काम झालं की, तिथे धावत जाऊन फोटो काढणाऱ्या माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी,रस्त्यावरील खड्डे, जागोजागी घाणीचे साम्राज्य याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.. हे आमच्या काळातलं नाही असं सांगून ही मंडळी, आपली जबाबदारी झटकत असतात. यावर समाजमाध्यमावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळतात.
अलीकडे माहीम रस्त्यावर दिवे लागल्यानंतर ही मंडळी त्याचे श्रेय घेत असल्याचे दिसताच नागरिकांनी जागोजागीचे खड्डे दाखवून खड्डेमय रस्ते कसे उजाळून निघाले इथपासून दिव्याखाली अंधार अशा प्रतिक्रिया दिल्या....
प्रशासकीय राजवट असल्याने जबाबदारी झटकणारी ही मंडळी, सरकारच्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत असतात...
हे चित्र आहे, दिवे लागल्यानंतर आम्ही कसे दिवे लावले, हे सांगत, त्याचे श्रेय लाटणारी तत्कालीन सत्ताधारी मंडळी तर दुसऱ्या बाजूने, घाणीचे साम्राज्य आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांचे होणारे हाल...ह्या पालघर नगरपरिषद हद्दीतील प्रातिनिधिक परिस्थितीचे...
पालघवासीयांसाठी लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेचा हा आरसा....