नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
*आनंदाची बातमी *
सफाळे व परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी... कोरोना काळात थांबा रद्द करण्यात आलेली 22927-22928 लोकशक्ती एक्सप्रेस ह्या गाडीला सफाळे येथे पुन्हा थांबा देण्यात आला आहे.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था तसेच अन्य प्रवासी संघटना व खासदार डॉ.हेमंत सावरा यांच्या अथक प्रयत्नांचे हे यश आहे. लवकरच, खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या हस्ते सफाळे रेल्वे स्थानकात या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या निर्णयाचे स्वागत केले जाईल.