पालघर येथील कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्साही प्रतिसाद

Date: 2025-09-09
news-banner
*पालघर येथील कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेला  जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्साही प्रतिसाद
-
             कोकण विभागीय माहिती कार्यालय, पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हयातील पत्रकारांसाठी ०९ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात “आधुनिक पत्रकारिता कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. या एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पणकरुन कार्यशाळेचा आरंभ करण्यात आला.  
            कार्यशाळेस  कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला,  विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य हर्षद पाटील, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव, कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी श्रध्दा घरत तसेच या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून  समाज माध्यम आणि कृत्रिम बुध्दीमता (AI) या विषयातील तज्ञ युवराज आर्य, सायबर गुन्हे तज्ञ उन्मेश जोशी, डिजीटल मिडियातील तज्ञ संजय मिश्रा आणि पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय घरत, विरार वसई पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे तसेच पालघर जिल्हयातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या अध्यक्षांसह विविध पदाधिकारी व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. 
          ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविक केले. सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी सूत्रसंचलन केले. विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर आणि ठाणे, जिल्हा परिषद पालघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ही कार्यशाळा यशस्वी करण्यास विशेष सहकार्य लाभले.

Leave Your Comments