१७६ रक्तदात्यांच्या सहभागातून कुणबी समाजाचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
पालघर : कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभाग यांच्या वतीने रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) मासवण (चहाडे नाका) येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत रक्तदान शिबिर अतिशय उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल १७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून महिला भगिनींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी यांनी भूषविले. उद्घाटन डॉ. श्रद्धा रमेश अधिकारी (एमबीबीएस, एमडी – इंटरनल मेडिसिन, नागझरी) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिव्येश चंद्रकांत पाटील (गोवाडे), संदेश साईनाथ पाटील (चहाडे – तरुण उद्योजक), अमोल भरत पाटील (गिराळे – ग्रामपंचायत सदस्य) व धीरज रवींद्र पाटील (उर्से – तरुण उद्योजक) उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवरांसह सहकार्य लाभले. कच्छ युवक संघ पालघर व राजीव गांधी रक्तपेढी, मिरा रोड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मंडळ व समाजाच्या दात्यांनी वस्तू व अन्य रूपाने मोठी मदत केली.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे विद्यमान विश्वस्त चेतन कमलाकर पाटील, उल्हास वसंत सातवी व मनोज मोहन ठाकूर, तसेच संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती. यावेळी समाजातील आजी-माजी पदाधिकारी, मान्यवर, महिला प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली. युवक मंडळाचे उपाध्यक्ष अमित प्रभाकर पाटील, तांदुळवाडी गटाचे कार्यकारिणी सदस्य प्रतीक संतोष पाटील व गट चिटणीस पंढरी कोंडू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे विद्यमान चिटणीस वैभव नारायण पाटील यांनी केले.
रक्तदान शिबिरासाठी आर्थिक योगदानही मोठ्या प्रमाणात मिळाले. उद्घाटक डॉ. श्रद्धा रमेश अधिकारी यांनी मंडळासाठी ₹५१,०००/-, डॉ. दिव्येश चंद्रकांत पाटील यांनी ₹२१,०००/-, धीरज रवींद्र पाटील यांनी ₹१०,०००/-, अमोल भरत पाटील यांनी ₹६,६६६/- तर संदेश साईनाथ पाटील यांनी ₹५,५११/- इतका निधी दिला.
या शिबिरातून समाजातील युवक-युवतींनी दाखवलेली उत्स्फूर्तता व सेवाभाव हा समाजातील ऐक्य आणि कार्यशीलता अधोरेखित करणारा ठरला.