नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
https://youtu.be/KasbIlKC7S4?si=Pr23lggJjUEairLn
सफाळ्यात सहा दुकानांना भीषण आग
मोठे आर्थिक नुकसान; जीवितहानी टळली
सफाळे (ता. पालघर) येथे रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. अचानक भडकलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पश्चिमेकडील बाजारपेठ भागात आग लागल्याचे समजताच नागरिकांनी पळापळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व माल भस्मसात झाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.
या आगीत रेहान बेकरी शॉप, चिकन शॉप, केक वाला, सलून, डिवाइन डेअरी आणि डिवाइन मोबाइल झोन ही दुकाने पूर्णतः जळून खाक झाली आहेत. प्राथमिक चौकशीत आग लागण्याचे कारण इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दुकान मालकांनी मोठ्या आर्थिक नुकसानीची तक्रार केली असून, आग लागल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे.