https://youtu.be/RMI69EJif_c?si=ADOp-t7bWjr90vCv
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
📰 पालघर जिल्हा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण
पालघर दि. २५ सप्टेंबर –
प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी आज पालघर जिल्हा परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी प्रशिक केशवराव रावळे यांनी केले. त्यांनी एआय म्हणजे काय, त्याचा सरकारी कामकाजात कसा वापर करता येतो, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे एआयच्या मदतीने कामकाज सुलभ आणि कार्यक्षम कसे होऊ शकते हेही समजावून सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना एआयची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद शरीकमसलत यांनीही उपस्थित राहून आपले विचार मांडले. “कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर प्रशासनातील निर्णय प्रक्रियेला अधिक परिणामकारक ठरवतो आणि लोकाभिमुखतेला नवा आयाम देतो,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी एआयबाबत प्रश्न विचारले व शंका निरसन झाले. तसेच तांत्रिक बदल स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रशिक्षणामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणे सोपे होईल. त्यामुळे प्रशासनिक कामकाज अधिक प्रभावी व जलद गतीने होईल. पुढील काळातही असे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.