पालघर, दि. २५ सप्टेंबर :
पालघर जिल्ह्यातील पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत ३० सप्टेंबर, २०२५ रोजी काढली जाणार आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने १ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार “महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (समितीचे व उपसभापती) (पदांचा आरक्षण व निवडणूक) नियम, १९६२” अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जात आहे.
सदर अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण वाचून दाखविण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील सहा पंचायत समित्या म्हणजे डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या समित्यांचा समावेश आहे. तसेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील पालघर व वसई पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण चक्रानुक्रमे निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
आरक्षण सोडतीचा तपशील :
अ.क्र. आरक्षण सोडतीचे ठिकाण दिनांक व वेळ
१ लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृह, कक्ष क्र. २१५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५, दुपारी २.०० वा.
पालघर जिल्ह्यातील सर्व इच्छुक नागरिकांना सदर सोडतीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
ही माहिती डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर यांनी दिली आहे.