पालघर,डहाणू, जव्हार नगरपरिषद, वाडा नगरपंचायत आणि वसई विरार महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर

Date: 2025-08-29
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar २४ ऑगस्ट : 

पालघर,डहाणू, जव्हार नगरपरिषद, वाडा नगरपंचायत आणि वसई विरार महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर

 जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषदेसह वाडा नगरपंचायत आणि वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.    
        या पाचही ठिकाणी निवडणूक आयोगामार्फत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असून यासाठी नगरपरिषद/नगरपंचायतसंबंधातील हरकती/सूचना ३१ ऑगस्टपर्यंत तर विरार-वसई मनपासंबंधातील ०४ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत.या तीन नगरपरिषदा, एक नगरपंचायत व एका महानगरपालिकेसाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे.

 
 पालघर नगरपरिषदेतून प्रत्येक प्रभागातून ०२ प्रमाणे, १५ प्रभागांमधून ३० सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यातील १७ सदस्य सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी असतील.या १७ सदस्यांपैकी ०९ जागा  महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीसाठी एक जागा असून ही जागा सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी ०४ जागा असून त्यातील ०२ जागा अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी ०८ जागा असून यापैकी ०४ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहेत. 
 
        डहाणू नगरपरिषदेची सदस्य संख्या २७ असून यातील १२ प्रभागातून प्रत्येकी  दोन सदस्य तर एक प्रभाग तीन सदस्यिय आहे. २७ पैकी सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी १४ जागा असतील. या १४ जागांपैकी ०६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. येथे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि ही एक जागा अनुसूचित महिलांसाठी राखीव आहे. तर अनुसूचित जमातीसाठी ०५ जागा आरक्षित असून यातील ०३ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहेत. येथे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ०७ जागा आरक्षित आहेत आणि या ०७ जागांपैकी ०४ जागा नामाप्र महिलांसाठी आरक्षित आहेत.
 जव्हार नगरपरिषदेची प्रभाग संख्या १० असून येथे प्रत्येक प्रभागातून ०२ प्रमाणे २० सदस्य निवडून द्यायचे आहेत.२० सदस्यांपैकी सर्वसाधारण खुल्या गटासाठी ०६ जागा आहेत. यापैकी ०२ जागा  महिलांसाठी आरक्षित आहेत.अनुसूचित जातीसाठी येथे ०२ जागा आहेत. पैकी ०१ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी ०७ जागा आरक्षित असून पैकी ०४ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ०५ जागा आरक्षित आहेत. पैकी ०३ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहेत. 
 वाडा नगरपंचायतची सदस्य संख्या  १७ असून येथे एक सदस्य प्रभाग पद्धत लागू आहे.१७ सदस्यांपैकी ०७ सदस्य सर्वसाधारण गटातील असतील.पैकी ०३ जागा  महिलांसाठी आरक्षित आहेत. येथे अनुसूचित जातीसाठी एक जागा असून ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. तर अनुसूचित जमातीसाठी ०४ जागा आरक्षित असून यापैकी ०२ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहेत. यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ०५ जागा आरक्षित असून पैकी ०३जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहेत.  पान २ वर
 विरार वसई महानगरपालिकाची प्रभाग रचना देखील जाहीर झाली असून यात ११५ सदस्यांसाठी २९ प्रभाग सुचविण्यात आले आहेत. यातील २८ प्रभागात 
प्रत्येकी  चार सदस्य असतील तर एक प्रभाग तीन सदस्यिय असेल. महानगरपालिकेची २०११ जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १२ लाख ३४ हजार ६९०इतकी असून  हे प्रभाग सरासरी ३९ हजार ते ४६ हजार लोकसंख्येचे बनल्याचे दिसते.

पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक  २०२५
नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या : ६८,९३०
अनुसूचित जातीची  लोकसंख्या :  ३४१९
अनु. जमातीची एकूण लोकसंख्या :९७२०
निवडून द्यावयाच्या नप सदस्य संख्या : ३०
प्रभागांची एकूण संख्या  :              १५
दोन सदस्यीय प्रभाग -                  १५
तीन सदस्यीय प्रभाग -                  ००

डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक  २०२५
नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या : ५०,२८७
अनुसूचित जातीची एकुण लोकसंख्या : २४७१
अनु. जमातीची एकूण लोकसंख्या : ९३२३
निवडून द्यावयाच्या नप सदस्य संख्या : २७
प्रभागांची एकूण संख्या  :              १३
दोन सदस्यीय प्रभाग -                  १२ तीन सदस्यीय प्रभाग -                 ०१

जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक  २०२५
नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या :  १२,०४०
अनुसूचित जातीची एकुण लोकसंख्या : ९२९
अनु. जमातीची एकूण लोकसंख्या : ४२०३ 
निवडून द्यावयाच्या नप सदस्य संख्या : २०
प्रभागांची एकूण संख्या  :  २०
दोन सदस्यीय प्रभाग - १० 
तीन सदस्यीय प्रभाग - ००

वाडा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक  २०२५
नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या : १६,७५० 
अनुसूचित जातीची लोकसंख्या :    ०८२५
अनु. जमातीची एकूण लोकसंख्या : ४४२१
निवडून द्यावयाच्या नप सदस्य संख्या :  १७
प्रभागांची एकूण संख्या  :               १७
एक सदस्यीय प्रभाग -                   १७

वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक  २०२५
नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या :१२,३४,६९० 
अनुसूचित जातीची लोकसंख्या : ५१,४६८ 
अनु. जमातीची लोकसंख्या :     ५८,६०८
निवडून द्यावयाच्या नप सदस्य संख्या : ११५ 
प्रभागांची एकूण संख्या  :               २९  
चार सदस्यीय प्रभाग -                   २८
तीन सदस्यीय प्रभाग -                  ०१

Leave Your Comments