नवयुग पालघर Navyug Palghar Weekly २४ ऑगस्ट :
नगरपरिषद प्रशासकीय इमारत ४६२१ चौ.फूट डॉ.आंबेडकर
सामाजिक सुविधा केंद्र इमारत रु. १८७०.२१ चौ.फूट दराने
नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आरसीसी व फिनिशिंग कामासाठी ४६२१ चौरस फूट दराने खर्च केला जात असताना नगरपरिषदेमार्फतच महाविद्यालयाच्या समोर पालघर- खारेकुरण रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या, पालघर- डहाणू तालुका बौद्ध युवक मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुविधा केंद्राच्या एकमजली इमारतीसाठी प्रति चौरस फूट १८२०.२१ रु. इतका खर्च होणार आहे. या इमारतीसाठी ६० लाख ३९ हजार २३५ इतका खर्च धरला आहे. १५० चौरस मीटर तळमजला व पहिला मजला १५० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची ही इमारत आहे. म्हणजेच हे बांधकाम ३२२९.१७ चौरस फुटाचे असणार आहे. या तफावतीवरुनच नगरपरिषदेछि प्रशासकीय इमारत सोन्याने मढवली जाणार आहे का,असा आमचा सवाल आहे.यातून दोन निष्कर्ष निघू शकतात, एक तर प्रशासकीय इमारत अत्युत्कृष्ट
दर्जाची बनवली जात असून डॉ आंबेडकर सामाजिक सुविधा केंद्र कमी दर्जाचे बनवले जात आहे. दर्जाचा आरोप मान्य नसेल तर प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी नवयुग पालघरने यापूर्वी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे अव्वाच्या सव्वा खर्च केला जात आहे, असेच म्हणावे लागेल.
डॉ आंबेडकर सामाजिक सुविधा केंद्र इमारती करिता ०१ कोटी २८ लाख २३ हजार ४४४ इतका खर्च करण्यात येत आहे. यामध्ये समाज मंदिर इमारतीकरता ( सिव्हिल काम) ६० लाख ३९ हजार २३५; स्वागत कमानीकरता ३ लाख ५८ हजार ८३५; कुंपण भिंतीकरता ३३ लाख २९ हजार ४०६ तर पेवर ब्लॉककरता ०८ लाख २४ हजार २३३ इतका खर्च दर्शविण्यात आला आहे.
प्रवेशद्वारापासून इमारतीपर्यंत २५ मीटर लांब आणि ०५ मीटर रुंद रस्त्यावर पेवर ब्लॉक लावले जाणार आहेत. यासाठी ०८ लाख २४ हजार २३३ इतका खर्च धरलेला आहे. तर कुंपण भिंत १६१ मीटर लांबीची, ०२ मीटर उंचीची व ०.२३ मीटर जाडीची बांधण्यात येत असून यासाठी ३३ लाख २९ हजार ४०६ इतका खर्च धरला आहे.
स्वागत कमान लोखंडी ग्रीलची बनवण्यात येणार असून याची लांबी ३.६० मीटर ,उंची २.५० मीटर इतकी असेल. यामध्येच छोटा प्रवेशद्वार लांबी १.२० मीटर व उंची ०२ मीटर असा ग्रील गेट असेल. या दोन्ही प्रवेशद्वारासाठी ०३ लाख ५८ हजार ८३५ इतका खर्च धरलेला आहे.ज्यांच्यासाठी हे केंद्र उभारले जात आहे, त्यातील किती जणांना यासंबंधीची माहिती आहे, हा देखील एक प्रश्नच आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ७२२२चौरस फूट दराने खर्च होत असल्याची बातमी यापूर्वी नवयुग पालघरने पूर्वीच्या अंकात दिलेली आहे.
याअंतर्गत कामांवर होत असलेला खर्च पहा..
आरसीसी: ०७,६६,८९, ३१२ आणि
फिनिशिंग काम :०७,५०,२३,४१२ मिळून केवळ इमारतीसाठी १५ कोटी १७ लाख १२ हजार ७२३इतका खर्च होणार आहे.तर,
विद्युतीकरण : ०३,०८,५०,२१०
फर्निचरसाठी: ०१,६७,२,७३४; कार्पोरेट इमारतीसाठी काचेच्या सुशोभीकरण कामासाठी तब्बल ०१,६२,१५,५८०
वातानुकुलीत व्यवस्था: ०१,२४,५५,२४७
(हे सर्व आकडे कोटीतील)
इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. तदनंतर अग्निशमन व्यवस्थेकरिता ५५ लाख १९ हजार ३८८,प्लंबिंग करता २६ लाख ७ हजार ५५१,
स्वामीत्वधनासाठी ०८ लाख ३८ हजार ५५९, चाचणीसाठी ०३ लाख ३१ हजार ४४५ इतकी तरतूद आहे.
याआधारेच मागील अंकात म्हटल्याप्रमाणे ३०५०.२७ चौरस मीटर अर्थात ३२ हजार ८३२ चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या या सर्व कामांसाठी २३ कोटी ७२ लाख ३३ हजार ७०१ इतका खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.याचाच अर्थ दर चौ.फूटासाठी नगरपरिषद ७२२२ रु. इतका खर्च करत आहे.
नगरपरिषदेच्या या संपूर्ण कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिलेली आहे.यात विद्युतीकरणाच्या कामाचाही समावेश आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशाप्रकारे या कामासाठी तांत्रिक मंजुरी देण्यासाठी सक्षम आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातही विद्युत विभाग स्वतंत्रपणे काम करत आहे.असे असताना, प्राधिकरणाने या कामाला मंजुरी कशी दिली.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग असताना,नगरपरिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मंजुरी का घेते?
एकूणच या कामात अनेक बाबतीत अवास्तव खर्च होणार असल्याचे दिसते.बिल्डर तथा विकासक २००० च्या दराने काम करत असताना,(जो वाजवी दर सामाईक सुविधा केंद्रासाठी दर्शविलेला आहे) इथे केवळ इमारतीकरिता ४६२०इतक्या दराने खर्च केला जात आहे, हे सर्व कोणासाठी आणि कोण करत आहे