ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये – पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीचे यांना निवेदन

Date: 2025-09-04
news-banner
https://youtu.be/yUnqkZmvzYw?si=5xvDleg8CoVz8DtG

नवयुग पालघर Navyug Palghar Weekly

ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये – पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीचे पालकमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी इंदु राणी जाखड यांना निवेदन

शासनाने मराठा समाजाकरिता काढलेल्या जीआरच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये, अन्याय होऊ नये, यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने तसेच ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना निवेदन देण्यात आले.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणास बाधा आणणारे निर्णय घेऊ नयेत, याबाबत ठाम भूमिका मांडली. पालघर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांमध्ये या संदर्भात तीव्र भावना असून शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

या निवेदनप्रसंगी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, निमंत्रक कुंदन संखे, उपाध्यक्ष भालचंद्र ठाकरे, निवृत्त सनदी अधिकारी आर. डी. संखे, पी. टी. पाटील, अरविंद वर्तक, जितेंद्र राऊळ यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ओबीसी समाजाचे विद्यमान आरक्षण हे संविधानिक हक्क आहे आणि कोणत्याही कारणाने त्यात हस्तक्षेप होऊ देणार नाही. शासनाने सर्व समाजांना न्याय देतानाच ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.

Leave Your Comments