**तलासरीत ५७ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त
पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाची कारवाई**
वर्षभरातील सर्वात मोठ्या कारवाईची नोंद करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दापचरी सीमा तपासणी नाका पथकाने तलासरी येथे ५७ लाखाच्या मद्यसाठ्यासा वाहन मिळून ७७ लाख १२ हजार ८०० रुपयांचा बेकायदा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक अर्जुनसिह याचे विरोधात तलासरी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दमण तसेच दादरा-नगर हवेली येथील विक्रीसाठी असलेला मद्यसाठा महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या आणला जाणार असल्याच्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश बारगजे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक आर. जी. सूर्यवंशी यांच्या पथकाने उधवा मार्गाजवळ सापळा रचत ही कारवाई केली.
शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित ट्रक येत असल्याचे पथकाच्या
निदर्शनास आले. अधिकार्यांनी अशोक लेलँड कंपनीचे आयशर वाहन थांबवून कागदपत्र व वाहनाच्या सखोल तपासणीदरम्यान ट्रकमधील वेलवेट वॉलपेपरच्या साठ्याखाली मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य व बिअरचा साठा लपवून ठेवलेला आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात रॉयल स्पेशल व्हिस्कीचे १६५ बॉक्स, रॉयल स्टॅग व्हिस्कीचे ८० बॉक्स, इम्पीरियल ब्लू व्हिस्कीचे ३० बॉक्स, रॉयल चॅलेंजर्स व्हिस्कीचे ८० बॉक्स, डीएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ५० बॉक्स, ट्युबॉर्ग स्ट्राँग बिअरचे १०० बॉक्स, किंगफिशर स्ट्राँग बिअरचे ८० बॉक्स तसेच बडवायझर मॅग्नम बिअरचे ३० बॉक्स असा एकूण ६१५ बॉक्स मद्यसाठा हाती लागला .
या कारवाईत भारतामध्ये तयार केलेले परदेशी शैलीचे मद्य (घ्ह्ग्aह श्a्ा इदrाग्ुह थ्ग्qल्दr) ३४९९.२ लिटर आणि बिअर २५२० लिटर असा एकूण ६०१९.२ लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण ७७,१२,८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. व्ही. शिवापूरकर, उपनिरीक्षक पी. सी. पाटील तसेच जवान योगेश अंभोरे, विठ्ठल शिंदे, गणेश शितोळे आणि महेंद्र पाडवी यांनी सहभाग घेतला