वसई मतदारसंघ: हितेंद्र ठाकूर यांचा धक्कादायक पराभव

Date: 2024-12-02
news-banner
वसई मतदारसंघ: हितेंद्र ठाकूर यांचा धक्कादायक पराभव 

           अत्यत प्रतिष्ठेची अशी वसई विधानसभा मतदारसँघातील निवडणूक अखेरपर्यंत चुरशीची ठरली.मात्र विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांना ३ हजार १५३ इतक्या कमी मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. महायुती भाजपा उमेदवार श्रमजीवी संघटनेच्या स्नेहा दुबे पंडित यांनी ७७ हजार ५५३ (३५.३८ %) मते मिळवित हितेंद्र ठाकूर यांना ७४ हजार ४०० मतांवरच रोखले.स्नेहा ह्या श्रमजीवी संघटनेचे विवेक व विद्यलॢता पंडित यांच्या कन्या. महाविकास आघाडी काँग्रेसचे विजय पाटील हे तिसर्‍या  नंबरवर राहिले तरी त्यांनी ६२ हजार ३२४(२८.४३टक्के) मते मिळविली. मतमोजणीच्या एकूण २६ फेर्‍यापैकी महायुती १० फेर्‍यांमध्ये, बहुजन  विकास आघाडी ०९ फेर्‍यांमध्ये व महाविकास आघाडी ०७ फेर्‍यांमध्ये आघाडीवर राहिली. लोकसभा २०२४ व विधानसभा २०१९ निवडणुकीच्या तुलनेत महायुतीच्या मतांचा टक्का अनुक्रमे ०२.७८ व ०५.१२ टक्क्यांनी घटूनही महायुती विजयी झाली. महाविकास आघाडीला लोकसभेच्या तुलनेत ०४.८८ टक्क्यांचा फटका बसला तर. २०१९ विधानसभेच्या तुलनेत देखील १२.०७ टक्क्यांचा फटका बसला. याउलट लोकसभा २०२४ निवडणुकीच्या तुलनेत बहुजन विकास आघाडीच्या मतांचा टक्का ०८.५३ वाढला. मात्र २०१९ विधानसभेच्या तुलनेत २०.२४ टक्के इतकी प्रचंड घट यावेळी पहावयास मिळाली.

Leave Your Comments