पालघर पोलिस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान

Date: 2026-08-19
news-banner

नवयुग पालघर
****पालघर पोलिस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान****

पालघर, दि. १४ ऑगस्ट २०२६ : पालघर जिल्हा पोलीस दलातील दीर्घकाळ सेवा तसेच निष्कलंक सेवेसाठी १५ पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ यासाठी निवड करण्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी त्यांना पदक देऊन सन्मानित केले. .
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेऊन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना अनुक्रमे २५ वर्षांच्या सेवेसाठी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ आणि १५ वर्षांच्या सेवेसाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्हा पोलीस दलातील १५ अधिकारी व अंमलदारांची या पदकांसाठी निवड जाहीर करण्यात आली.
अति उत्कृष्ट सेवा पदक – २५ वर्षे सेवा
१. रविंद्र सुभाष नाईक – पोलीस उपअधीक्षक – पोलीस उपअधीक्षक (गृह), पालघर
२. रणवीर प्रकाश बयेस – पोलीस निरीक्षक – मनोर पोलीस ठाणे (तत्कालीन नियुक्ती)
३. दत्तात्रेय बाजीराव किंद्रे – पोलीस निरीक्षक – वाडा पोलीस ठाणे (तत्कालीन नियुक्ती)
४. रविंद्र बाबुराव वानखेडे – पोलीस उपनिरीक्षक – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
५. अनिल पांडुरंग दिघोळे – पोलीस उपनिरीक्षक – जिल्हा विशेष शाखा, पालघर
६. प्रकाश महादू नवले – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – जिल्हा विशेष शाखा, पालघर
७. किरण हरीशचंद्र अंभिरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पालघर
उत्कृष्ट सेवा पदक – १५ वर्षे सेवा
१. प्रदीप श्रीपती पाटील – पोलीस निरीक्षक – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
२. सुनील साहेबराव जाधव – पोलीस निरीक्षक – बोईसर पोलीस ठाणे
३. विशाल राजेंद्र शिर्के – पोलीस उपनिरीक्षक – जनसंपर्क अधिकारी कार्यालय, पालघर
४. दिपक शांताराम राऊत – पोलीस हवालदार – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
५. सचिन नारायण चौधरी – पोलीस हवालदार – वाचक शाखा, पालघर
६. पराग कमलाकर म्हात्रे – पोलीस हवालदार – अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर
७. नरेंद्र नाना पाटील – पोलीस हवालदार – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर
८. दिनेश मावजी गायकवाड – पोलीस हवालदार – स्थानिक गुन्हे शाखा, पालघर

             पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

Leave Your Comments