*पालघर विभागाची १० सप्टेंबर रोजी डाक अदालत

Date: 2026-09-05
news-banner

नवयुग पालघर
*पालघर विभागाची १० सप्टेंबर रोजी डाक अदालत*

पालघर, दि. ३ सप्टेंबर २०२६ : डाक सेवांबाबत सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पालघर विभागाच्या वतीने १० सप्टेंबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

पालघर विभागाचे अधीक्षक डाकघर यांच्या अध्यक्षतेखाली ही डाक अदालत १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मीरा रोड विभागीय डाकघर, प्रथम मजला, मीरा रोड–४०११०७ येथे होणार आहे. या वेळी विभागीय अधिकारी तक्रारदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

पालघर विभागाशी संबंधित आणि सहा आठवड्यांच्या आत निकाली न निघालेल्या डाक सेवा विषयक तक्रारी डाक अदालतीत विचारात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये अपंजीकृत व नोंदणीकृत डाक, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक तसेच मनीऑर्डरची रक्कम अदा न होणे आदी तक्रारींचा समावेश आहे.

तक्रार सादर करताना मूळ तक्रार ज्या अधिकारी किंवा कार्यालयाकडे करण्यात आली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम नमूद करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित डाक लेख, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदींचा आवश्यक तपशील तक्रारीत द्यावा लागणार आहे.

इच्छुक ग्राहकांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींमध्ये तयार करून अधीक्षक डाकघर, पालघर विभाग, मीरा रोड–४०११०७ यांच्या कार्यालयात ९ सप्टेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. ९ सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची डाक अदालतीसाठी दखल घेतली जाणार नाही, असे डाक विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

🌐 navyugpalghar.com  |  Follow Us :  f  X  ▶ YT  ◎ Instagram
#पालघर #डाकअदालत #डाकसेवा #IndiaPost #Palghar #PostalServices #DakAdalat

Leave Your Comments