प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना *केळवे रोड स्थानकावर १५ जुलै रोजी नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम*लोकल, मेमू, एक्सप्रेस रेल्वे सेवेत बदल

Date: 2026-07-13
news-banner
नवयुग पालघर

🚆 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
*केळवे रोड स्थानकावर १४–१५ जुलै रोजी नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम*
              १४ जुलै (मंगळवार) मध्यरात्रीपासून ते १५ जुलै (बुधवार) दुपारी १२ वाजेपर्यंत केळवे रोड रेल्वे स्थानकावर जुन्या स्टेशन कार्यालयातील रेल्वे संचालन व्यवस्था नवीन स्टेशन कार्यालयात स्थलांतरित करण्याचे नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम करण्यात येणार आहे.
यामुळे १५ जुलै रोजी काही लोकल, मेमू व एक्सप्रेस गाड्यांच्या सेवेत बदल करण्यात आले आहेत.
❌ पूर्णपणे रद्द गाड्या
🚆 61001 बोईसर – वसई रोड MEMU
🚆 93012 डहाणू रोड – विरार लोकल
🚆 93014 डहाणू रोड – विरार (विस्तारित चर्चगेट) लोकल
🚆 93013 विरार – डहाणू रोड लोकल
🚆 93015 चर्चगेट – डहाणू रोड लोकल
⚠️ अंशतः रद्द
🚆 19002 सूरत – विरार एक्सप्रेस
पालघरपर्यंतच धावेल.
🚆 61002 डोंबिवली – बोईसर MEMU
वसई रोडपर्यंतच धावेल.
▶️ अंशतः सुरू
🚆 59039 विरार – वलसाड पॅसेंजर
विरारऐवजी पालघर स्थानकावरून सुटेल.
📢 प्रवाशांना आवाहन
       १५ जुलै रोजी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच घराबाहेर पडावे.

         शक्य असल्यास पर्यायी गाडी किंवा वेळेचे नियोजन करावे.
         रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या बदलांची नोंद घेऊनच प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

Leave Your Comments