**सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या-- प्राथमिक/माध्यमिक शाळा प्रकल्पाचे भूमिपूजन**

Date: 2026-03-08
news-banner

नवयुग पालघर Navyug Palghar Weekly

https://youtu.be/EWBr1nB79_M?si=r0xe22658sSwaNtd

**सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या-- प्राथमिक/माध्यमिक शाळा प्रकल्पाचे भूमिपूजन**

आजवर संस्थेची जी काही विकास कामे झाली ती मुख्यत: महाविद्यालय केंद्रित राहिली. मात्र आजचा हा दिवस आगळावेगळा आणि ऐतिहासिकही आहे. कारण आपण आज वेगळ्या वाटेकडे जात आहोत.आपण आज नवीन शाळेची पायाभरणी करत आहोत. हे उदगार आहेत सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे  यांचे.संस्थेच्या आजवरच्या वाटचालीच्या पानाला  सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरलेल्या नवीन शाळा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.  या प्रकल्पांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शाळा उभारल्या जाणार आहेत.  
           प्राथमिक शाळेसाठी महेश मोतीलाल भानुशाली यांनी आपल्या आई  हर्षदा मोतीलाल भानुशाली यांच्या नावाने दीड कोटी रुपयांची देणगी दिली असून प्राथमिक विभागाला ‘श्रीमती हर्षदा मोतीलाल भानुशाली प्राथमिक विद्यालय’ असे नाव देण्यात आले. या नवीन  इमारतीचे भूमिपूजन दानशूर उद्योजक महेश भानुशाली त्यांच्या मातोश्री हर्षदा भानुशाली, पत्नी नीलम भानुशाली यांच्यासह भानुशाली कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
१९६९ मध्ये सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीची स्थापना झाली आणि त्यानंतर १९७० मध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची सुरुवात झाली. सुरुवातीला कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांपासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास पुढे विविध
फॅकल्टीज आणि लॉ कॉलेजपर्यंत विस्तारत राहिला आहे. 
कोरे यांनी या प्रसंगी बोलताना  शाळा आणि महाविद्यालय या दोन स्वतंत्र संकल्पना असून संस्थेच्या शैक्षणिक विस्तारासाठी हा नवा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट केले. १९७० साली महाविद्यालयाच्या  भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी जसा ऐतिहासिक क्षण अनुभवला, त्याचप्रमाणे २०२६ मध्ये शाळेच्या पायाभरणीच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्वजणही या नवीन वाटचालीचे साक्षीदार  ठरत असल्याचे सांगून भविष्यात जेव्हा जेव्हा या शाळेच्या भूमिपूजनाचा किंवा उद्‌घाटनाचा विषय चर्चेत येईल, तेव्हा येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी तो अभिमानाचा क्षण असेल असे ते म्हणाले.
या प्रकल्पांतर्गत सुमारे ६४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित असून यात तळमजला तसेच तीन मजल्यांची भव्य इमारत उभारली जाणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे हे बांधकाम दीपक पिंपळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. 
या भूमिपूजन कार्यक्रमास सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश संखे, सुरेश जोशी, सुधीर दांडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, डॉ.तानाजी पोळ, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या पायल चोलेरा, पी.डी. घोडे, अश्विन भानुशाली, योगेश म्हात्रे,  भरत राऊत, अमिता राऊत, अमोल वर्तक, निनाद सावे, हिमाली राऊत, रामप्रकाश निराला,जगन्नाथ पावडे, अॅड. दीपक सावले तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments