नवयुग पालघर
*****केळवे रोड स्थानकावरील रेल्वे संचालन व्यवस्था नव्या स्टेशन कार्यालयात; १४ व १५ जुलैला ब्लॉक,
अनेक गाड्यांवर परिणाम*****
***सिग्नलिंग व्यवस्था नव्या कार्यालयात स्थलांतरित;
काही लोकल रद्द, अनेक एक्स्प्रेस उशिराने,
काही गाड्या लघु-समाप्त व लघु-प्रारंभ***
केळवे रोड स्थानकावरील जुन्या स्टेशन कार्यालयातून रेल्वे संचालनाची (सिग्नलिंग व इंटरलॉकिंग) व्यवस्था नव्याने उभारलेल्या स्टेशन कार्यालयात स्थलांतरित करण्याचे काम १४ व १५ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून प्री-नॉन-इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत विरार–डहाणू मार्गावरील काही उपनगरीय, मेमू तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्या विलंबाने धावतील तर काही गाड्या लघु-समाप्त किंवा लघु-प्रारंभ करण्यात येणार आहेत.
हे काम विरार–डहाणू रोड (पहिला टप्पा) चौथ्या रेल्वेमार्ग प्रकल्पाचा भाग असून, नव्या स्टेशन कार्यालयातून रेल्वे संचालन सुरू करण्यासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली आणि आर्मरिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेत आवश्यक बदल, पॉइंट वायरिंग आणि प्रणालीचे कमिशनिंग केले जाणार आहे.
📌 ब्लॉकचे वेळापत्रक
🟡 प्री-एनआय ब्लॉक १४ जुलै २०२६ (मंगळवार) सायं. ४.०० ते ५.३०
🔴 एनआय ब्लॉक १५ जुलै २०२६ (बुधवार) सकाळी ८.१० ते ११.१०
*१४ जुलै रोजी उशिराने धावणाऱ्या गाड्या*
22961: मुंबई सेंट्रल–अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस /२५ मिनिटे
82901: मुंबई सेंट्रल–अहमदाबाद तेजस एक्सप्रेस /२५ मिनिटे
12954: हजरत निजामुद्दीन–मुंबई सेंट्रल तेजस राजधानी /३० मिनिटे
20932 : इंदूर–तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्सप्रेस /१ तास ४५ मिनिटे
22956 : भुज–वांद्रे टर्मिनस कच्छ एक्सप्रेस /१ तास ५० मिनिटे
12479 : जोधपूर–वांद्रे टर्मिनस सूर्यनगरी एक्सप्रेस / १ तास ३० मिनिटे
12489 : श्रीगंगानगर–दादर एक्सप्रेस /३० मिनिटे
❌ १५ जुलै रोजी पूर्णपणे रद्द
गाडी क्रमांक
61001 : बोईसर–वसई रोड मेमू (सकाळी ८.३५)
93012 : डहाणू रोड–विरार लोकल (सकाळी ९.३७)
93014 : डहाणू रोड–विरार लोकल (सकाळी १०.२२)
93013 : विरार–डहाणू रोड लोकल (सकाळी ९.३०)
93015 : चर्चगेट–डहाणू रोड लोकल (सकाळी ८.४९)
⏳ १५ जुलै रोजी उशिराने / नियमन
गाडी क्रमांक
93202 :डहाणू रोड–चर्चगेट लोकल (७.१७) /२५ मिनिटे
12922 : सुरत–मुंबई सेंट्रल फ्लाइंग राणी /२५ मिनिटे
93010 : डहाणू रोड–बोरिवली लोकल (८.३५) /२५ मिनिटे
22962 : अहमदाबाद–मुंबई सेंट्रल वंदे भारत /१ तास
12934 :अहमदाबाद–मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस /४० मिनिटे
12932 : अहमदाबाद–मुंबई सेंट्रल एक्सप्रेस /३० मिनिटे
82902 : अहमदाबाद–मुंबई सेंट्रल तेजस /२५ मिनिटे
69139 : बोरिवली–वलसाड मेमू /२५ मिनिटे
93009 : चर्चगेट–डहाणू रोड लोकल (७.११)/ २५ मिनिटे
09055 : बांद्रा टर्मिनस–उधना स्पेशल /४० मिनिटे
19015 : दादर–पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस /३० मिनिटे
🚉 लघु-समाप्त / लघु-प्रारंभ
19002 सुरत–विरार एक्सप्रेस : पालघर येथे लघु-समाप्त.
61002 डोंबिवली–बोईसर मेमू (सकाळी ५.४९) : वसई रोड येथे लघु-समाप्त.
59039 विरार–वलसाड पॅसेंजर : पालघर येथून लघु-प्रारंभ.
📦
प्रवाशांनी :
✔ प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत स्थिती तपासा.
✔ रद्द झालेल्या लोकलचा पर्याय आधीच निश्चित करा.
✔ आवश्यक असल्यास पुढील किंवा पर्यायी गाड्यांचा वापर करा.
✔ रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरील अद्ययावत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करा.