नवयुग पालघर
**गणरायाचे वाजत-गाजत आगमन; पालघर जिल्ह्यात १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १२ हजार ५६४ गणपतींची स्थापना***
पालघर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींचीही मोठ्या संख्येने स्थापना होणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय उपलब्ध माहितीनुसार १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १२ हजार ५६४ गणपतींची स्थापना होणार आहे. यामध्ये १ हजार ९५१ सार्वजनिक, तर १० हजार ६१३ घरगुती गणपतींचा समावेश आहे. गणेशोत्सव व गौरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.पोलीस ठाणेनिहाय पाहता, बोईसरमध्ये सर्वाधिक २ हजार ३५७ गणपती, तर त्यापाठोपाठ पालघरमध्ये २ हजार ३१, वाड्यात १ हजार २२८, सातपाटीत ९८०, सफाळ्यात ८६२, मनोरमध्ये ५७४, डहाणूमध्ये ८९२, जव्हारमध्ये ५७३, विक्रमगडमध्ये ५५३, मोखाड्यात ६४३, तारापूरमध्ये ४१५, केळव्यात २४४, तलासरीत ३२८, घोलवडमध्ये २८०, वाणगावमध्ये २१४ आणि कासा येथे ३१० गणपतींची स्थापना होणार आहे.
पालघर पोलीस ठाणे हद्दीत १४८ सार्वजनिक आणि १,८८३ घरगुती गणपती, मनोर येथे १२४ सार्वजनिक व ४५० घरगुती, सफाळे येथे ८४ सार्वजनिक व ७७८ घरगुती, केळवा येथे ५४ सार्वजनिक व १९० घरगुती, सातपाटी येथे १५३ सार्वजनिक व ८२७ घरगुती, बोईसर येथे २३२ सार्वजनिक व २,१२५ घरगुती, तारापूर येथे ९४ सार्वजनिक व ३२१ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे.
वाणगाव येथे ९७ सार्वजनिक व १९७ घरगुती, डहाणू पोलीस ठाणे हद्दीत १९० सार्वजनिक व ७०२ घरगुती, तलासरी येथे १४८ सार्वजनिक व १८० घरगुती, घोलवड येथे १०० सार्वजनिक व १८० घरगुती, जव्हार येथे १२८ सार्वजनिक व ४४५ घरगुती, कासा येथे ११० सार्वजनिक व २०० घरगुती, विक्रमगड येथे ९३ सार्वजनिक व ४६० घरगुती, वाडा येथे ७८ सार्वजनिक व १,१५० घरगुती, तर मोखाडा येथे ११८ सार्वजनिक व ५२५ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे.
यासोबतच गौरी आगमनाचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालघर पोलीस ठाणे हद्दीत २७ सार्वजनिक व १५० घरगुती गौरी, मनोर येथे ७० सार्वजनिक व १७ घरगुती, सफाळे येथे ८ सार्वजनिक व ६३ घरगुती, केळवा येथे २३ सार्वजनिक व १३ घरगुती, सातपाटी येथे १६ सार्वजनिक, बोईसर येथे १२ सार्वजनिक व ६५ घरगुती, तारापूर येथे ९ सार्वजनिक व ३२ घरगुती, वाणगाव येथे ३० घरगुती, डहाणू येथे २५ घरगुती, तलासरी येथे १० घरगुती, घोलवड येथे २ सार्वजनिक व ३ घरगुती, जव्हार येथे ७ घरगुती, कासा येथे ७ घरगुती, विक्रमगड येथे ६२ घरगुती, तर वाडा येथे १६५ घरगुती गौरींची स्थापना होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणुका, सार्वजनिक मंडळांमधील गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जिल्ह्यात गणरायाचे वाजत-गाजत स्वागत होणार असून, गौरी आगमनाने उत्सवाला आणखी रंगत येणार आहे.
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #पालघर #पालघरजिल्हा #गणपतीउत्सव #गौरीआगमन #गणरायाचेआगमन #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #Palghar #PalgharNews #MaharashtraNews #NavyugPalghar
www.navyugpalghar.com
नवयुग पालघर
Instagram | Facebook | X | YouTube
नवयुग पालघर — पालघरच्या बातम्यांचा विश्वासू आवाज.