नवयुग पालघर
***पालघरच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव**
////इयान सबीनो लोपिस, देव जतिन आणि साना पीटर गोन्सालविस यांना २०२४-२५ चा जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात आला. भिमराव गवई (बॅडमिंटन) यांना २०२४-२५, तर प्रसाद हेमंत पाटील (बॉक्सिंग) यांना २०२५-२६ चा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला. झारखंड येथील खेलो इंडिया स्पर्धेत ४x१०० व ४x४०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या निशा सांबर यांचाही विशेष गौरव करण्यात आला.////
पपालघर, दि. १६ ऑगस्ट २०२६ : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व मार्गदर्शकांचा १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
देव रुपारेलिया (बॅडमिंटन), साना गोन्सालविस (बॉक्सिंग) आणि इयान लोपिस यांची जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड त्यांच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय कामगिरीच्या आधारे झाली.
निशा सांबर यांनी खेलो इंडिया स्पर्धेत दोन रिले प्रकारात कांस्यपदक मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
भिमराव गवई आणि प्रसाद पाटील यांचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक खेळाडू घडले आहेत.
राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व १० हजार रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे.