दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे 12 सप्टेंबर २०२५ रोजी रोजगार मेळावा

Date: 2025-09-11
news-banner
नवयुग पालघर 31.08/07.09

दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे 12 सप्टेंबर २०२५ रोजी रोजगार मेळावा 

 सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या वतीने १२ सप्टेंबर २०२५ रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बँकिंग, आयटी, मायक्रोफिनान्स, केमिकल इंडस्ट्री, फार्मासिटिकल, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या सहभाग घेणार आहेत. 
        महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून अथवा लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील उपस्थितांची नोंदणी  करण्यात येईल असेही महाविद्यालयाने म्हटले आहे.

Leave Your Comments