पालघर जिल्हा : दहावी निकालात मुलींची पुन्हा बाजी; वसई तालुका अव्वल, जिल्ह्यात मुलांचा निकाल ९०.८९ टक्के, तर मुलींचा निकाल तब्बल ९५.१८ टक्के

Date: 2026-05-16
news-banner
नवयुग पालघर विशेष :

**पालघर जिल्हा : दहावी निकालात मुलींची पुन्हा बाजी; 
वसई तालुका अव्वल, जिल्ह्यात मुलांचा निकाल ९०.८९ टक्के, तर मुलींचा निकाल तब्बल ९५.१८ टक्के **

           महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेच्या निकालात पालघर जिल्ह्यात मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी करत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.९२ टक्के लागला असून, मुलांचा निकाल ९०.८९ टक्के, तर मुलींचा निकाल तब्बल ९५.१८ टक्के नोंदवला गेला आहे.
        जिल्हाभरात एकूण ६०,९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६०,५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३८८ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले. निकालाच्या टक्केवारीत वसई तालुक्याने ९४.४६ टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर पालघर तालुका ९३.४५ टक्क्यांसह दुसर्‍या, मोखाडा ९२.४७ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला. सर्व तालुक्यांत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे .
तालुकानिहाय निकालाचे विश्लेषण
१) वसई तालुका जिल्ह्यात अव्वल
बसले: ३६,२७८
उत्तीर्ण: ३६,१२३ अनुत्तीर्ण: १५५
निकाल: ९४.४६ %   
मुलींचा निकाल: ९६.६१ टक्के (जिल्ह्यात सर्वोच्च)
२) पालघर तालुका - दुसरा क्रमांक :बसले: ८,०६९, 
उत्तीर्ण: ८,०२४,
अनुत्तीर्ण: ४५,
 निकाल:९३.४५ % मुलींचा निकाल ९५.२८ %
३) मोखाडा तालुका -
तिसरा क्रमांक:बसले: १,१५४,
उत्तीर्ण: १,१४३,अनुत्तीर्ण: ११, 
निकाल ९२.४७/ मुलींचा निकाल ९४.६२ %
४) विक्रमगड तालुका:बसले: २,१४५, उत्तीर्ण: २,१२२,अनुत्तीर्ण: २३, 
निकाल: ९१.९८ % /मुलींचा निकाल ९४.६१ %
५) डहाणू तालुका:बसले: ४,९४८, उत्तीर्ण: ४,९१३,
अनुत्तीर्ण: ३५, 
निकाल: ८९.५५ % /मुलींचा निकाल ९३.०६ %
६) वाडा तालुका:बसले: ३,०५९, उत्तीर्ण: ३,०२३,
अनुत्तीर्ण: ३६, 
निकाल: ८८.३२ % / मुलींचा निकाल ९०.४१ %
७) तलासरी तालुका:बसले: ३,४६४, उत्तीर्ण: ३,४०१
अनुत्तीर्ण: ६३, निकाल: ८७.८५ %/ मुलींचा निकाल ९१.८७ %
८) जव्हार तालुका:बसले: १,८२१, उत्तीर्ण: १,८०१,
अनुत्तीर्ण: २०, 
निकाल: ८७.३९ % /मुलींचा निकाल ८९.७४ %

          जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांत मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक लागला. विशेषत: वसई, पालघर, मोखाडा आणि विक्रमगड येथे मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Leave Your Comments