नवयुग पालघर
***जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका;
१४ जणांचा मृत्यू, ८,०९६ पशुहानी, सार्वजनिक मालमत्तेचे १४,६९८.८४ लाखांचे नुकसान***
४ जूनपासून झालेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून याचा सर्वाधिक फटका पालघर, सफाळे, केळवारोड,बोईसर व परिसरातील गावांना बसला.पालघर शहर, लोकमान्यनगर, विष्णूनगर, माहीमरोड, बोईसर रोड.गोठणपूर, डुंगीपाडा. विरेंद्रनगर टेंभोडे महाविद्यालय मार्ग पाण्याखाली गेले.
सफाळे येथे रेल्वे स्थानकापासून सर्व दुकाने व पुढे गेरूच्या ओहोळापर्यंत आणि सफाळे गावातील अनेक घरात पाणी शिरले.केळवे तसेच माकूणसारलाही मोठा फटका बसला.बोईसरसह डहाणू तालुक्यालाही पुराचा फटका बसला.
वसईची तर कथाच वेगळी आहे..तब्बल ५ दिवस पाण्याखाली.वीज नाही,मोबाईल नाही,पिण्याचे पाणी नाही
९ जुलैपर्यंत १४ नागरिकांचा मृत्यू, ८,०९६ पशुहानी, १,३०७ नागरिकांचे स्थलांतर, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे ?१४,६९८.८४ लाखांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये वसई ६ ,पालघर ३,डहाणू २,तलासरी १,मोखाडा १,विक्रमगड १ समावेश आहे. तर अतिवृष्टीत एकूण ८,०९६ जनावरांचा मृत्यू झाला.
पूरस्थितीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने १,३०७ नागरिकांचे, पालघर ८२०, वसई ४७१,वाडा १६ स्थलांतर करण्यात आले होते. प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या एकही नागरिक स्थलांतरित शिबिरात नाही.
अतिवृष्टीमुळे २ घरे पूर्णपणे, २ घरे अंशत:पडली , ४ कच्च्या घरांचे पूर्ण,४ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान , २ झोपड्यांचे नुकसान ,१ पोल्ट्री शेडचे नुकसान झाले आहे.
विविध विभागांच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (पालघर) – ३८ कामे; अंदाजे ६,५८५ लाख , जिल्हा परिषद पालघर ८६ ठिकाणी; अंदाजे १,३५७.१० लाख, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ४ कामे;२०० लाख , सार्वजनिक बांधकाम विभाग (जव्हार)७४ कामे; ६,४५२ लाख मिळून सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १४५.९४ कोटींचे नुकसान झाले आहे. महावितरण (पालघर) – १०६ ठिकाणी; १०४.७४ लाखाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान गाव पातळीवर प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्याचे काम सुरु असून येत्या काही दिवसात नुकसानीचा नेमका अंदाज येईल.