पालघरमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

Date: 2026-10-02
news-banner

नवयुग पालघर 
***पालघरमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी***
पालघर : विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसने उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालय, पालघर येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विविध भागातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच व्होट चोरी विरोधात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुखवटे घालून निषेध व्यक्त केला. 
काँग्रेसने  विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदार याद्यांमध्ये कथित अनियमितता, मतदारांची नावे वगळण्यासंदर्भातील प्रश्न तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत आक्षेप नोंदवले. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने  विशेष सखोल पुनरीक्षण च्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला. ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पदावरून दूर करावे आणि अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केली आहे. या आरोपांबाबत काँग्रेसने आपल्या निवेदनात तीव्र शब्दांत भूमिका मांडली आहे.
निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजाबाबत द इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या वृत्तांकनात दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत विविध निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे वृत्त दिले आहे. त्यात ,विशेष सखोल पुनरीक्षण, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि मतदार डेटाबेसच्या केंद्रीकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. 

आंदोलनात सुरेंद्र शेट्टी, पराग पष्टे, सिकंदर शेख, रविश नाचन, बलवंत गावित, स्वप्निल पाटील, मोईन शेख,मेणे, रसिक भानुशाली, मनोहर दांडेकर, रोशन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लोकशाही, संविधान आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचे संरक्षण करण्याची मागणी केली. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली.
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानेही २९ सप्टेंबरच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

#पालघर #काँग्रेस #सत्यमठाकूर #ज्ञानेशकुमार #SIR #मतदारयादी #निवडणूकआयोग #धरणेआंदोलन #लोकशाही #संविधान #Palghar #Congress #GyaneshKumar #ElectionCommission #SIR
Follow us on 
F | X | Instagram | YouTube
नवयुग पालघर

Leave Your Comments